Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद अष्टेकर, कार्याध्यक्षपदी आनंद कुलकर्णीराष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कोल्हापुरात शनिवारी बैठकउद्धव ठाकरेंची भेट, पण नाराजी कायम ! प्रामाणिकपणाचे फळ म्हणून जिल्हाप्रमुखपदी निवड-रविकिरण इंगवलेसावकार मादनाईक भाजपात दाखल, शिरोळमध्ये भाजपाला मिळाला नवा नेताविद्यापीठातील औद्योगिक रसायनिक शास्त्रमधील विद्यार्थ्यांची निवड आर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डी. टी. शिर्के न्यू वूमन्स फार्मसीचा शंभर टक्के निकालरोहिणीदेवी जयवंतराव घाटगे यांचे निधनडॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

जाहिरात

 

न्यू वूमन्स फार्मसीचा शंभर टक्के निकाल

schedule02 Jul 25 person by visibility 34 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :   प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीचा  (डिप्लोमा इन फार्मसी) निकाल शंभर टक्के आहे. प्रथम बॅचच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले.     महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे उन्हाळी परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला. यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार केला.  द्वितीय व प्रथम वर्षातील विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.  द्वितीय वर्षातील प्रथम क्रमांक सिद्धी सुतार (83.82 टक्के), द्वितीय-  वैष्णवी सुतार (79.82 टक्के), तृतीय- हर्षदा पाटील (79.55 टक्के), सोनल वडणगेकर(79.82 टक्के) व निकत मुल्ला (75.18 टक्के ) यांचा समावेश आहे.  प्रथम वर्षातील मृण्मयी मोरे (81.70 टक्के), शिवानी भोसले (78.60 टक्के), पायल लाड (77.40 टक्के), अमृता तिवले(74.60 टक्के), आरती माने (73.80 टक्के) यांनी यश मिळवले. या यशाचे मुख्य श्रेय संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सुसज्ज प्रयोगशाळा, अद्यावत लायब्ररी व सर्व सोयसुविधा आणि सतत मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक वर्गाला आहे असे प्राचार्य डॉ.रविंद्र कुंभार यांनी नमूद केले. तर या निकालामुळे फार्मसी शिक्षणाचे दर्जात्मक स्थान अधोरेखित झाले आहे.संस्था केवळ शिक्षणापूर्ती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहे.असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन डॉ.के.जी पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थिनी आरती माने, कु.सोनल वडणगेकर यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी प्रा.पियुषा नेजदार यांनी  शुभेच्छा दिल्या.या विशेष सत्कार प्रसंगी संस्थेचे व्हाइस चेअरमन डी. जी.किल्लेदार, संचालक पी.सी. पाटील उपस्थित होते. पूजाश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes