न्यू इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये स्क्रूटिनी सेंटर मंजूर – डॉ. संजय दाभोळे
schedule02 Jul 25 person by visibility 32 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सरकारच्या सीईटी सेलद्वारे राबविल्या जाणाऱ्या डिग्री इंजिनीअरिंग केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत स्क्रूटिनी सेंटर येथील न्यू इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी)येथे मंजूर झाले आहे. प्रवेश फॉर्म भरताना होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सरकारने नेमून दिलेल्या स्क्रूटिनी सेंटरमध्ये फॉर्म भरावा असे आवाहन एनआयटीचे संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी केले आहे. स्क्रूटिनी सेंटरमध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन, प्रवेश फॉर्म भरुन निश्चिती, कागदपत्रांची पडताळणी व अपलोड करणे, त्रुटीचे निराकरण केले जाते. तसेच ऑप्शन फॉर्म भरुन निश्चित करणे या प्रक्रिया केल्या जातात.सरकारने, मुलींना शंभर टक्के शिक्षण शुल्क माफी दिले आहे. विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेतल्यावरच सरकारच्या सर्व फी, शिष्यवृत्ती त्यांना लागू होतात. अधिक माहितीसाठी स्क्रूटिनी सेंटरप्रमुख प्रा. रवी पाईकराव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.