सावकार मादनाईक भाजपात दाखल, शिरोळमध्ये भाजपाला मिळाला नवा नेता
schedule02 Jul 25 person by visibility 55 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती सावकार मादनाईक यांनी भातीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मादनाईक यांचे स्वागत झाले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राजवर्धन निंबाळकर, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, भाजपचे शिरोळ तालुकाध्यक्ष महेश देवताळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय भोजे, भाजप किसान मोर्चाचे राज्य सचिव भगवान काटे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष शैलेश आडके, विजय माणगावे, मिलिंद साखरपे, सतीश हेगाणा उपस्थित होते. दरम्यान, मादनाईक यांचा भाजपा प्रवेश हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी व शिवसेना शिंदे गटालाही धक्का आहे. मादनाईक हे जवळपास २५ वर्षे चळवळीत सक्रिय आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थापनेपासून ते पहिल्या फळीतील नेते म्हणून सक्रिय होते. त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली होती. जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम समिती सभापतीपदी काम केले आहे. मादनाईक यांच्या भाजपा प्रवेशासाठी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांचा पुढाकार राहिला आहे. मादनाईक यांच्या माध्यमातून शिरोळ विधानसभा मतदारसंघात भाजपाला नवा नेता मिळाला. काही महिन्यापूर्वी मादनाईक यांनी स्वाभिमानीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता ते भाजपात दाखल झाले आहेत.