रोहिणीदेवी जयवंतराव घाटगे यांचे निधन
schedule02 Jul 25 person by visibility 412 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कागलमधील सर्जेराव केनवडेकर संस्थानिक घराण्यातील श्रीमती रोहिणीदेवी जयवंतराव घाटगे यांचे सोमवारी
( एक जुलै 2025) रोजी दुपारी निधन झाले. गडहिंग्लज तालुक्यातील दाभेवाडी येथील देसाई इनामदार या घराण्यात त्यांचा जन्म झाला होता तर कागल तालुक्यातील केनवडे गावच्या घाटगे (सर्जेराव) या घराण्यातील श्रीमंत कै आबासाहेब घाटगे आणि तंजावर संस्थांनच्या राजकन्या पद्मादेवी यांच्या त्या स्नुषा होत्या. मृत्यू समयी त्या 70 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे, दीर, पुतणे, असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी 03 जुलै रोजी कागल वैकुंठधाम येथे सकाळी नऊ वाजता आहे.