Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चचणतट डडशिक्षकांनी मराठीला स्वप्नांची भाषा बनवावी, स्वप्नांची भाषा ही भवितव्याची असते – डॉ. सुनीलकुमार लवटेखालील डडशिक्षक मतदारसंघ भाजपकडे ! कौस्तुभ गावडेंची उमेदवारी जाहीर !!डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुराव्यासहित इतिहासाची पुनर्मांडणी  केली : प्राचार्य डॉ.डी. आर. मोरे गोकुळच्या जागा वाटपासाठी महायुतीच्या नेतेमंडळीवर दिल्लीला जाण्याची वेळ - आमदार सतेज पाटलांचा खोचक टोलाशिक्षक संघ पदवीधरच्या मैदानात ! एस. व्ही. पाटील निवडणूक लढविणार !!सेवानिवृत्तीनिमित्त महावीर सोळाकुंरे यांचा रविवारी गौरव समारंभकाँग्रेसची उमेदवारी जाहीर, पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकरइंडियन प्लबिंग असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

जाहिरात

 

शिक्षकांनी मराठीला स्वप्नांची भाषा बनवावी, स्वप्नांची भाषा ही भवितव्याची असते – डॉ. सुनीलकुमार लवटे

schedule03 Oct 26 person by visibility 61 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘सरकार आज शिक्षणावर कमी आणि क्राँकिटीकरणावर  जास्त पैसे खर्च करत आहे. कारण शिक्षणात कमिशन नाही, याउलट क्राँक्रिटमध्ये जास्त कमिशन असते. एकीकडे शाळा आणि शिक्षणासाठी तरतुदीचा अभाव तर दुसरीकडे शिक्षणेत्तर अनुदानाचा तर पत्ताच नाही. मग ग्रंथालये चालणार कशी ? वाचनसंस्कृती वाढणार कधी ? अशा स्थितीत मराठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे, त्यांनी मराठी साहित्याचा सार्वजनिक धांडोळा घेतला पाहिजे. मराठीला स्वप्नांची भाषा बनवावी, कारण कारण स्वप्नांची भाषाही भवितव्याची भाषा असते. मराठी शिक्षकांची चौफेर नजर जिथे असते तिथे मराठीला अंत नाही.’असे परखड मत साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी काढले.

कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे अभिजात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलन आयोजित केले आहे. राम गणेश गडकरी हॉल येथे या संमेलनाच्या उद्घाटन सोहळयात संमेलनाध्यक्ष या नात्यांनी साहित्यिक लवटे यांनी भाषेविषयक मुक्तचिंतन मांडले. मराठी साहित्य, संमेलने त्यामागील भूमिका विषद करताना त्यांनी कधी जुने दाखले देत तर उपस्थितांशी संवाद साधत लवटे यांनी, ‘मराठी भाषा, साहित्य विकासात १९००व्या शतकापासून मराठी शिक्षकांचे योगदान मोठे असल्याचे सांगितले. ब्रिटीशकाळात प्रशासनान मराठीचे स्थान नगण्य होते.अशा काळात मातृभाषेचा विकास व्हावा या भूमिकेने ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना झाली होती. लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, वि. स. खांडेकर, सानेगुरुजी, ना. सी. फडके, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्यिक योगदानाची महती’ सांगितली.

‘अभ्यासक्रमात समाविष्ठ केल्यामुळे मराठी भाषा टिकणार नाही. जी भाषेत बाजारभाव चालतो, जी भाषा व्यावहारिक बनते तीच भाषा टिकते. मराठी भाषा आणि मराठी माध्यमांच्या शाळांच्या गळतीला भाषेविषयीची चुकीची मानसिकता कारणीभूत आहे. पालकांच्या आकांक्षा, अस्मिता इंग्रजीप्रचुर झाल्या आहेत. अशा मानसिकतेसोबतच सरकारी धोरणही तितकेच मराठीला मारक ठरत आहेत. सरकार शिक्षण व मराठी शाळेवर पैसे खर्च करत नाही. अशा स्थितीत मराठी भाषा टिकवणे, वाढविणे आणि शुद्ध ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण व समर्पण वृत्तीने अध्यापन, सकस व अभिरुचीपूर्ण वाचन स्वत विकसित होताना विद्यार्थी घडवावेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व आहे.’असे लवटे म्हणाले.

 संमेलनाच्या उद्घाटनपूर्वी अर्ध शिवाजी पुतळा ते राम गणेश गडकरी सभागृहापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली.जिल्ह मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. उद्घाटन सोहळयाप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सी. एम गायकवाड, विश्वास सुतार, पी.डी. पाटील, विजय सरगर, सोनल गाडेकर, मनिषा डांगे, नेताजी डोंगळे, आदी उपस्थित होते. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. बी. एस. कांबळे यांनी आभार मानले.

................

 

लवटेंनी केले आर. वाय. पाटलांचे कौतुक

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव आर.  वाय. पाटील यांच्या कामकाजाविषयी साहित्यिक लवटे यांनी भाषणात कौतुकोद्गार काढले. आर. वाय. पाटील हे संवेदनशील वृत्तीचे व द्रष्टे मुख्याध्यापक आहेत. डी. बी. पाटील यांनी ज्या निष्ठेने, पावित्र्याने मुख्याध्यापक संघ  चालविले त्याच विचाराने आर. वाय. काम करतात.’असे लवटे म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes