Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चचणतट डडशिक्षकांनी मराठीला स्वप्नांची भाषा बनवावी, स्वप्नांची भाषा ही भवितव्याची असते – डॉ. सुनीलकुमार लवटेखालील डडशिक्षक मतदारसंघ भाजपकडे ! कौस्तुभ गावडेंची उमेदवारी जाहीर !!डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुराव्यासहित इतिहासाची पुनर्मांडणी  केली : प्राचार्य डॉ.डी. आर. मोरे गोकुळच्या जागा वाटपासाठी महायुतीच्या नेतेमंडळीवर दिल्लीला जाण्याची वेळ - आमदार सतेज पाटलांचा खोचक टोलाशिक्षक संघ पदवीधरच्या मैदानात ! एस. व्ही. पाटील निवडणूक लढविणार !!सेवानिवृत्तीनिमित्त महावीर सोळाकुंरे यांचा रविवारी गौरव समारंभकाँग्रेसची उमेदवारी जाहीर, पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकरइंडियन प्लबिंग असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

जाहिरात

 

डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुराव्यासहित इतिहासाची पुनर्मांडणी  केली : प्राचार्य डॉ.डी. आर. मोरे 

schedule03 Oct 26 person by visibility 28 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन : ज्येष्ठ इतिहास संशोधक, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. जयसिंगराव पवार यांनी  विविध ऐतिहासिक पुराव्यांसहित इतिहासाची  पुनर्मांडणी केले.  राजर्षी शाहू महाराजांच्या वरती बृहत ग्रंथ लिहून त्यांचे विचार जगभर पोचवणारे आणि मराठ्यांचा इतिहासाची व्याप्ती वाढवणारे ते संशोधक होते.’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे यांनी केले. 
    श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार इतिहास लेखन, संशोधन आणि योगदान या विषयावर एक दिवशी राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीमती वसुधा जयसिंगराव पवार, प्राचार्य टी एल पाटील प्रा. अरुण भोसले, डॉ. अरुंधती पवार, मंजुश्री पवार, डॉ रघुनाथ डमकले, श्री शिपुरकर, नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे,  यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.    यावेळी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या यांच्यावरील  शहाजी वार्ताच्या तिसाव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. आर.के .शानेदिवाणी यांनी प्रास्ताविक केले.
पहिल्या सत्रात डॉ. अवनीश पाटील यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहास लेखनातील डॉ. जयसिंगराव पवार यांचे योगदान या विषयावर सविस्तर विवेचन केले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ.भरत भूषण माळी यांनी भूषवले. 
    परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात डॉ.सुरेश शिखरे यांनी जयसिंगराव पवार यांची इतिहास लेखन पद्धती : विषेश संदर्भ सेनापती संताजी घोरपडे यांचे चरित्र या विषयावर सविस्तर माहिती दिली. इतिहास डॉ. मंजुश्री पवार यांनी इतिहास संशोधक माझे बाबा यावर विचार व्यक्त केले. डॉ. अरुंधती जयसिंगराव पवार यांनी या राष्ट्रीय परिसंवादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून महाविद्यालयाला धन्यवाद दिले. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ इतिहास संशोधक, लेखक प्राचार्य डॉ.इस्माईल पठाण होते. प्राचार्य डॉ. जे.के.पवार यांच्या उपस्थितीत व प्राचार्य शानेदिवाण यांच्या अध्यक्षतेखाली समारोप झाले प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, डॉ.आर.डी . मांडणीकर ,डॉ. के.एम.देसाई, डॉ.पूनम भुयेकर, प्रा.अशिस उपस्थित होते. प्रा.पी.के.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिवाजी रायजादे यांनी आभार मानले.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes