गोकुळच्या जागा वाटपासाठी महायुतीच्या नेतेमंडळीवर दिल्लीला जाण्याची वेळ - आमदार सतेज पाटलांचा खोचक टोला
schedule03 Oct 26 person by visibility 88 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी, ‘महायुतीचे नेते आता दिल्लीत जाणार आहेत. पुढील रणनीतीसाठी दिल्लीत बैठक होणार असून, गोकुळ दूध संघाच्या पॅनेल साठी महायुतीचे सर्व नेते सोमवारी ७ तारखेला दिल्लीला जाणार आहेत. तेथे पक्षश्रेष्ठींसोबत महत्त्वाची बैठक करून निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली’ अशी उपासमात्मक टीका केली.
गोकुळ दूध संघाच्या खासगीकरणासाठी २०० कोटी रुपयांची ऑफर दिली गेल्याचा खळबळजनक दावा माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दावा केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला असून, "माजी मंत्र्यांनी केलेला हा दावा अत्यंत गंभीर असून महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. गोकुळ दूध संघ 'मल्टीस्टेट होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही मोठा लढा दिला. जर त्यावेळी गोकुळ मल्टीस्टेट झाला असता, तर आता गोकुळच्या निवडणुका कधी झाल्या हे दूध उत्पादकांना कळलेसुद्धा नसते. तत्कालीन भाजप सरकारच्या काळातील दुग्धविकास मंत्र्यांकडेच काही लोक गोकुळ मल्टीस्टेट करण्यासाठी देवाण-घेवाणीची चर्चा घेऊन गेले होते, ही बाब आता समोर आली आहे. गोकुळवर आलेले हे खासगीकरणाचे संकट बाजूला करायचे असेल, तर आगामी निवडणुकीत दूध उत्पादकांनी आमच्या समविचारी आघाडीलाच पूर्ण ताकदीने साथ द्यावी," असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे माजी संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बाबासो चौगले आदी उपस्थित होते.