काँग्रेसची उमेदवारी जाहीर, पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर
schedule02 Oct 26 person by visibility 156 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रा. जयंत आसगावकर यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रा. आसगावकर हे २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झाले होते. पक्षाने, त्यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास व्यकत करत शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. ते, महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. आमदार म्हणून गेल्या सहा वर्षात त्यांनी विविध शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला. आंदोलनात सक्रिय राहिले.