Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक संघ पदवीधरच्या मैदानात ! एस. व्ही. पाटील निवडणूक लढविणार !!सेवानिवृत्तीनिमित्त महावीर सोळाकुंरे यांचा रविवारी गौरव समारंभकाँग्रेसची उमेदवारी जाहीर, पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकरइंडियन प्लबिंग असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रमकिकवी दूध प्रकल्प मालमत्ता खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, शिवसेना ठाकरे पक्षाची मागणीशिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी - प्राचार्य अभयकुमार साळुंखेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रव्यवहाराची दखल न घेणाऱ्या कार्यालयांवर कारवाई कराअखिल भारतीय किसान सभेचे २४ वे अधिवेशन कोल्हापुरात‘स्वमन सामाजिक’तर्फे कोल्हापुरात मानवाधिकारसंबंधी जनजागृतीप्रॅक्टिस फुटबॉल क्लबतर्फे बुधवारी आजी – माजी फुटबॉलपटूंचा सत्कार

जाहिरात

 

सेवानिवृत्तीनिमित्त महावीर सोळाकुंरे यांचा रविवारी गौरव समारंभ

schedule03 Oct 26 person by visibility 10 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सरकारी नोकरीतील पस्तीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्याबद्दल सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील लेखाधिकारी महावीर भाऊसो सोळाकुंरे यांचा रविवारी (४ ऑक्टोबर २०२६) कोल्हापुरात गौरव समारंभ आयोजित केला आहे. नागाळा पार्क येथील बालाजी गार्डन येथे सकाळी ११ वाजता हा सत्कार सोहळा होत आहे. या सत्कार सोहळयाला विविध भागातील वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 सोळाकुंरे यांच्या सरकारी नोकरीचा प्रारंभ १९९२ मध्ये झाला. गगनबावडा पंचायत समितीत जवळपास नऊ वर्षे त्यांनी काम केले. वरिष्ठ सहायक लेखाधिकारी म्हणून छाप पाडली. त्यानंतर राधानगरी पंचायत समितीत पदोन्नतीने बदली झाली. कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी वित्त व बांधकाम विभागात काम करताना उठावदार काम केले. सहायक लेखाधिकारी म्हणून काम करताना कामात एक प्रकारची शिस्त निर्माण केली. सातारा येथेही त्यांनी काही काळ काम केले.

 कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्षपदी काम केले. जिल्हा परिषद कर्मचार सहकारी सोसायटीत संचालक होते. २०१६  मध्ये सोसायटी चेअरमन म्हणून ठसा उमटविला. आता ते सुकाणू समितीत आहेत. एप्रिल २०२३ मध्ये जिल्हा परिषदेच्या सेवेतून कार्यमुक्त होण्याअगोदर त्यांनी सोसायटीच्या संचालकपदाचा  व युनियनच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. २०२३ मध्ये त्यांची सोलापूर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. जवळपास साडे तीन वर्षे त्यांनी सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखाधिकारी म्हणून काम केले. विविध ठिकाणी काम करत असताना साऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे मित्र परिवार निर्माण केला. त्यांच्या आतापर्यंच्या कामाचा गौरव सेवानिवृत्त सोहळयाच्या निमित्ताने होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes