इंडियन प्लबिंग असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम
schedule02 Oct 26 person by visibility 23 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : इंडियन प्लंबिंग असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरतर्फे (कोल्हापूर ,सांगली, सातारा , रत्नागिरी , सिंधुदुर्ग ) तीन, दहा व १७ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापुरातील रोटरी समाज केंद्र येथे ट्रेनिंग देण्यात येणार आहे. यामध्ये थेरॉटिकल प्रेझेंटेशन, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, प्रायोजक कंपन्यांकडून तांत्रिक माहिती या गोष्टींचा समावेश असेल. तर २४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या ट्रेनिंग आणि परीक्षेमध्ये सहभागी झालेल्यांना सहभाग प्रमाणपत्र ही दिले जाणार आहे. तसेच यातील गुणवत्ता मिळवलेल्या उमेदवारांना चेन्नई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठीही पाठवले जाणार आहे . प्लंबिंग हे क्षेत्र तसे नवीन नाही पण यामध्येही रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी मधु किरण न्यू महाद्वार रोड येथे संपर्क साधावा. यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरमित सिंग अरोरा ,सचिव मनिष जैन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या प्रशिक्षणाचे संयोजन कोल्हापूर चॅप्टरचे रवि साळुंखे, किरण जोशी, देवांग शेठ ,गिरीश कुलकर्णी, सुशांत नांगरे ,शीतल पाटील यांनी केले आहे. इच्छुकांनी संघटनेशी संपर्क करावा.