+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही हे शाहू महाराजांनी दाखवून दिले-कपिल पाटील adjust आमदार प्रकाश आवाडे निवडणूक लढवणार, हातकणंगलेत अपक्ष उमेदवारी adjustगोकुळमार्फत सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा adjustशिक्षक बँकेतील राजकारणाचे कवित्व ! एकमेकांच्या कामकाजाचा पर्दाफाश ! adjustगोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री adjustरोटरी गार्गीजतर्फे सोळा एप्रिलला भरतनाट्यम कार्यक्रम adjustसभेच्या मान्यतेने अमृत संजीवनी योजना, विक्रमी नफ्यामुळे विरोधकांना पोटशूळ- अध्यक्ष राजेंद्र पाटील adjustनिवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा-हसन मुश्रीफ adjustशक्तिपीठ महामार्ग धनदांडग्यासाठी, शेतकऱ्यांची बैलगाडी त्यावर धावणार का ? - संजय घाटगे adjustटेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार - जिल्हाधिकारीसो अमोल येडगे
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Mar 24 person by visibility 136 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी, कोल्हापूरतर्फे ईडीची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. "ईडी-ईडी लावा काडी" अशा घोषणा देत होळी पेटवण्यात आली. ईडीच्या नावाने शिमगा करत आंदोलन करण्यात आल्याचे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना अटक केली आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यामातून भाजपने केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी केलेले हे षडयंत्र असून यासाठी ईडीचा गैरवापर केला जात असल्याचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना सह-संपर्क प्रमुख विजय देवणे, अतुल दिघे, आप उपाध्यक्ष सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, अमरसिंह दळवी, डॉ. कुमाजी पाटील, स्मिता चौगुले, मयुर भोसले, डॉ. उषा पाटील, उमेश वडर, शशांक लोखंडे, आनंदा चौगुले, राजेश खांडके, इस्थेर कांबळे, स्वप्नील काळे, विवेक भालेराव, राकेश गायकवाड, सफवान काझी, सचिन पाटील आदी उपस्थित होते.