+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule02 Oct 24 person by visibility 246 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयतर्फे स्वच्छ्ता ही सेवा या अभियान अंतर्गत स्वच्छ्ता अभियान रंकाळा पदपथ उद्यान येथे राबवण्यात आले. यावेळी रंकाळा पदपथ उद्यान येथील परिसराची स्वच्छ्ता करण्यात आली.
यावेळी बोलताना बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक राजीव गुप्ता म्हणाले की, स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँकिंग सोबत सामाजिक भावना जपत वेगवेगळे सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असते. स्वच्छ्ता हा महत्त्वाचा घटक असून प्रत्येकाने आपल्या घरच्याप्रमाणे आपापल्या परिसरातील स्वच्छ्ता ही तेवढ्याच आस्थेने जपली पाहिजे.
महापालिकेचे सफाई कर्मचारी हे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी कार्य करतात, ते खऱ्या अर्थाने आरोग्य दूत आहेत असेही ते म्हणाले. यावेळी बँकेतर्फे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार क्षेत्रीय प्रबंधक राजीव गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास रंकाळा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील, मुख्य प्रबंधक पंकज कुमार, तृप्ती फातले, वैभव साठे, सूर्यकांत माळी यांच्यासह कोल्हापुरातील विविध शाखांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.