+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Aug 22 person by visibility 390 categoryजिल्हा परिषद
धरणस्थळावर शेतकरी- अधिकाऱ्यांशी संवाद
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
‘चार वर्षापूर्वी राजे फाउंडेशनच्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून चिकोत्रा खोऱ्याला वरदान ठरणारे चिकोत्रा धरण 100 टक्के भरण्यासाठीच्या उपाययोजना केल्या. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस होऊनही राजे फौंडेशनने केलेल्या प्रयत्नातून सलग तिसऱ्यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे .याचे समाधान वाटते. ’ असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी चिकोत्रा धरण स्थळावर शेतकऱ्यांशी बोलताना केले.
चिकोत्रा धरण शंभर टक्के भरत आहे.आता पुढचे पाऊल म्हणून धरणाखालील प्रत्येक गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे.या हेतूने कापशी परिसरातील बेळुंकी गावापर्यंत पाईप लाईन टाकून सायपन पद्धतीने प्रत्येक गावच्या जॅकवेलमध्ये पाणी सोडल्यास प्रत्येक गावाला शुद्ध पाणी देता येईल.अशी संकल्पना जलयुक्त शिवारचे अध्यक्ष उमेश देसाई यांनी मांडली आहे.याबाबतचा आमचा सर्व्हे चालू आहे.यासाठी आवश्यक ते पाठबळ देऊ.अशी ग्वाही घाटगे यांनी यावेळी दिली.
सलग तिसऱ्या वर्षी हे धरण भरल्यानंतर त्यांनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. अधिकाऱ्यांशी आणखी काढावयाच्या चरी व पाणी नियोजनबाबत चर्चा केली. यावेळी शाखा अभियंता नितेश रानमाळे, सुनील पाटील,वनविभागाचे अमोल चव्हाण, प्रियांका येरुडकर,दत्तात्रय जाधव, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,आतिषकुमार देसाई,प्रवीण लोकरे, सदाशिव पाडेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
……………
राजे फौंडेशनच्या प्रयत्नांस यश
यावर्षी १७७४ मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर हे धरण भरले तर २०२१ मध्ये १७२८ मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर धरण भरले होते. २०२० मध्ये २१९५ मिलिमीटर पाऊस झाला होता. भरले होते. यावरून आजच्या तुलनेत ४०० मिलीमीटर कमी पाऊस होऊन सुद्धा लवकर धरण भरण्यास आरळगुंडीच्या पठारावर राजे फाउंडेशनच्या माध्यमातून मारलेल्या चरींचा व घातलेल्या बांधाचा फायदा झाला आहे.असे घाटगे यांनी यावेळी स्पष्ट केले.