न्यू वूमन्स फार्मसीमध्ये विद्यार्थिनींचे उत्साहात स्वागत
schedule17 Dec 24 person by visibility 97 categoryशैक्षणिकलाइफस्टाइलमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूऱ् : येथील श्री प्रिन्स मराठा बोर्डिंग हाऊस सचलित, न्यू वूमन्स फार्मसीमध्ये डी फार्मसीच्या नवोदित विद्यार्थीनींचा स्वागत समारंभउत्साहात पार पडला. सिरीचे संचालक सचिन कुंभोजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, तरूणपिढी ही आधुनिक भारताचे भविष्य आहे. जीवनात संघर्ष असतो. परंतु जिद्द असल्यास यशाकडे निश्चितच जाता येते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात मात्र सतत शिकत राहा. फार्मसी क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी आहेत. प्राचार्य रविंद्र कुंभार यांनी महाविद्यालयाचा परिचय उपस्थित पालक व विद्यार्थीनींना करून देण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन के.जी.पाटील यांनी नवोदित विद्यार्थीनींना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संचालक विनय पाटील यांनी विद्यार्थ्यांना संशोधन तसेच आधुनिक औषधे त्याचा सुयोग्य वापर व प्रामाणिकपणे या क्षेत्रात कामगिरी करावे असे नमूद केले. संस्थेचे विकास अधिकारी डॉ.संजय दाभोळे यांनी विद्यार्थीनींना डी फार्म वरच न थांबता उच्च शिक्षण घ्यावे व वेगवेगळ्या उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घेवून त्यामध्ये अग्रेसर कामगिरी करावे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष बी.जी.बोराडे यांनी फार्मसी क्षेत्र व समाज यांचे जवळचे नाते असून व्यवसाय, नोकरी, संशोधन करताना विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे व सचोटीने त्यामध्ये उतरावे असे नमूद केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे व्हाइस चेअरमन डी.जी. किल्लेदार, संचालक वाय. एल.खाडे, आर.डी.पाटील, सी.आर.गोडसे, पी.सी.पाटील, संभाजी मेटील. न्यू फार्मसीचे प्राचार्य डॉ सचिन पिशवीकर उपस्थित होते. प्रा.निकिता शेट्टे व प्रा.सविता म्हाळुंगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. वैष्णवी निवेकर, प्रा.पियुषा नेजदार व प्रा.दिव्या शिर्के यांनी विशेष परिश्रम घेतले.