+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule25 Jul 24 person by visibility 183 categoryमहानगरपालिका
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार येथील सहा स्क्रॅप मटेरियल विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडे सिंगल युज प्लास्टिकचा साठा आढळला.  त्यांना एक लाख दहा हजार दंडाची नोटीस बजावली. घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ अंतर्गत संबंधित सहा दुकानदारांना नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचेल अशा पद्धतीने घनकचरा जमा केल्याबाबत एक लाख रुपये दंड आणि एकल युज प्लॉस्टिक बंदी अंतर्गत रुपये दहा हजार अशी दंडाची कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी  व्यापा-यांनी बॉटल, प्लास्टिक पिशव्या, रबर्स इत्यादी कोणत्याही रिसायकलिंग शिवाय पुनर विक्रीसाठी दुकानात आणि दुकानाच्या बाहेर संकलित, साठवणूक केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ही  कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी तपासणी दरम्यान केली आहे. यापैकी एक व्यापारी यासीन स्क्रॅप मर्चंट यांनी एकल युज प्लास्टिक बंदी बाबतची दंडाची रक्कम रुपये दहा हजार आज आरोग्य विभागाकडे भरणा केलेली आहे. तर एक लाख दंडाची वसुली अद्याप प्रलंबित आहे. उर्वरीत पाच दुकानदारांना दंडाची रक्कम भरण्यास सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.