+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule13 Aug 24 person by visibility 1024 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पोलिस असल्याची बतावणी करत एका तरुणाकडून, पिस्तुलचा धाक दाखवून शाहूपुरीत व्यापाऱ्याला धमकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी, रात्री शाहूपुरी येथील व्यापारी संदीप विश्वनाथ नष्टे यांना धमकावण्यात आल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. शाहूपुरी चौथी गल्ली येथील नष्टे यांच्या निवासस्थानी हा प्रकार घडला.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संदीप नष्टे हे आपल्या कुटुंबीयासमवेत शाहूपुरी चौथी गल्ली येथे राहतात. सोमवारी (१२ ऑगस्ट), रात्री साडे नऊ वाजण्याच्या एक तरुण नष्टे यांच्या घरासमोर आला हे संदीप नष्टे यांचे घर आहे का ?अशी विचारणा करत थेट घरात शिरला. तो तरुण साधारणपणे चाळीस वर्षाचा असावा. तोंडावर मास्क होता. अंगात चौकडा शर्ट होता. जीन्स परिधान केला होता.
घरात शिरताना आपण पोलिस असल्याचे त्याने सांगितले. तुमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार आहे, तुम्ही हे प्रकरण मिटवणार की वाढवणार अशी विचारणा केली. जवळपास अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. त्या तरुणाविषयी संशय आल्याने नष्टे कुटुबांतील सदस्यांनी त्याला घराबाहेर जाण्यास सुनावले. तेव्हा त्या तरुणाने, व्यापारी संदीप नष्टे यांच्या दिशेने पिस्तुल रोखले. तरुणाकडून पिस्तूल रोखण्यात आल्याने नष्ट कुटुंबीय घाबरले. आरडाओरड केली. आरडाओरड आणि गोंधळ वाढताच त्या तरुणाने घरातून पळ काढला.