+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Sep 22 person by visibility 399 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने शिवाजी विद्यापीठाला ‘कॅटेगरी-१’ विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. ही माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्य स्थितीत राज्यातील फक्त दोनच विद्यापीठांना हा दर्जा मिळाला आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे. या दर्जामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनेकविध सोयीसुविधा प्राप्त होण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे. याचा लगोलग विद्यापीठाला झालेला लाभ म्हणजे विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राला युजीसीकडून सलग पाच वर्षांसाठी मान्यता मिळालेली आहे.
युजीसीने विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला. त्यानुसार ‘नॅक’ (बंगळूर) यांचे ३.५१ सीजीपीए गुणांकन आणि त्यावरील गुणांकनप्राप्त विद्यापीठांसाठी ‘कॅटेगरी-१’, ३.२६ ते ३.५० या दरम्यान गुणांकनप्राप्त विद्यापीठे ‘कॅटेगरी-२’ आणि त्याव्यतिरिक्त सर्व विद्यापीठे ‘कॅटेगरी-३’ अशी ही श्रेणीरचना केली आहे. शिवाजी विद्यापीठाला नॅकच्या ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ‘A++’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे युजीसीकडून विद्यापीठाला ‘कॅटेगरी-१’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
या दर्जामुळे विद्यापीठास स्वतःचे संचलित महाविद्यालय चालवावयाचे असल्यास त्यासही मान्यता मिळू शकते. शिवाजी विद्यापीठ आता ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यासही पात्र ठरले आहे. नजीकच्या काळात शैक्षणिक आणखीही लाभ शिवाजी विद्यापीठाला पर्यायाने विद्यार्थ्यांना होतील, शिर्के यांनी व्यक्त केली.