+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule29 Mar 24 person by visibility 272 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : चहूबाजूंनी घनदाट जंगल, सारा प्रदेश डोंगरझाडीचा, पक्क्या रस्त्यांचा अभाव, जवळपास दहा किलोमीटर अंतरावर मुख्य रस्ता, एखादी वस्तू आणायची म्हटले की दोन अडीच मैल अंतराची पायपीट ठरलेली... जंगली जनावरांच्या भीतीने सायंकाळी पाच नंतर घराचे दरवाजे बंद... हे चित्र आहे, बांद्राई धनगर वाडा येथील. चंदगड तालुक्यात हा भाग. या जंगलवाटेतून शाहू महाराज येथील नागरिकांना भेटण्यासाठी दाखल झाले आणि साऱ्या परिसराचा नूरच बदलून गेला. शाहू छत्रपतींना समोर पाहून सर्वसामान्य नागरिकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. साहजिकच साऱ्यांच्या मुखातून "शाहू छत्रपती की जय"अशा घोषणा उमटल्या.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे 28 व 29 मार्च रोजी चंदगड तालुका दौऱ्यावर आहेत या दोऱ्यात विविध भागात भेटी दिल्या. नागरिकाशी संवाद साधला. शुक्रवारी 29 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शाहू छत्रपती हे बांद्राई धनगरवाडा येथे पोहोचले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे,चंदगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई, टीम सतेजचे पदाधिकारी सोबत होते. बांद्राई धनगरवाडा हा परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर लांब. चार वर्षांपूर्वी या गावात लाईट आली. गावात एकूण 22 कुटुंबे, अडीशेच्या आसपास लोक वस्ती. चंदगडपासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर हा वाडा.
जंगलाच्या मध्यभागी वसलेला.आसपास चारी बाजूने गच्च झाडी. धनगर वाड्यापासून मुख्य रस्ता दहा किलोमीटर अंतरावर. मुख्य रस्त्यापासून धनगरवाडापर्यंत पोहोचण्यासाठी कच्चा रस्ता. घरे कौलारूची, काही विटांनी बांधलेली. काही घरांच्या भिंतीभोवती प्लास्टिकचे आवरण. "रोजगारासाठी मैल दोन मैल अंतर चालत जायचे. आतापर्यंत धनगर वाड्याला कुठल्याच लोकप्रतिनिधींनी भेट दिली नाही. शाहू छत्रपती धनगरवाड्यावर आले, आमच्याशी बोलले. हा आमच्या दृष्टीने खूप आनंदाचा क्षण आहे."अशा प्रतिक्रिया या भागातील धोंडीबा डोईफोडे भागूबाई लांबोरे यांनी व्यक्त केल्या‌. दरम्यान शाहू छत्रपती धनगर वाडा येथे येणार आहेत हे समजताच येथी नागरिकांच्या आनंदाला भरती आले होते. नागरिकांनी साऱ्या परिसराची साफसफाई केली होती .घरासमोरील अंगण सारवले. छानशी रांगोळी काढली. शाहू छत्रपतींचे आगमन होताच साऱ्यांनीच त्यांचा जयघोष केला‌. सारा धनगरवाडा एका घरात एकवटला. महिलांनी शाहू छत्रपतींचे औक्षण केले. शाहू छत्रपतींनी प्रत्येकाशी संवाद साधला. लहान मुलांच्या सोबत फोटो घेतले. अर्धा पाऊण तासाच्या भेटीने या परिसराचा माहौलच बदलून गेला. हाताला रोजगार, पक्का रस्ता यासंबंधीची मागणी येथील नागरिकांनी केल्या. शाहू छत्रपती, "जरूर तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करू" अशी ग्वाही दिली. शाहू महाराज धनगरवाडा येथून परतताना पुन्हा एकदा साऱ्यांनी, " शाहू छत्रपती की जय"अशा घोषणा दिल्या. शाहू छत्रपतींच्या भेटीने धनगरवाडावासियांची स्थिती आकाश ठेंगणे  झाल्यासारखे होती