+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule26 Jul 24 person by visibility 129 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पूरग्रस्त कुंभार समाजाला त्वरित मदत मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले. तसेच कुंभार वसाहत बाटप कॅम्प येथे पाहणी केली.  
भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली संत गोरा कुंभार वसाहत  येथे पूर परिस्थितीची पाहणी करण्यात आली.  याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, सत्यजित  कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.  उच्च व  तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर परिस्थतीमध्ये मदतीसाठी आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही याप्रसंगी नागरिकांना दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत संकपाळ यांची भेट घेऊन सध्या चालू असलेल्या आपत्ती व्यवस्थापने बद्दल सखोल माहिती घेतली.
 संत गोरा कुंभार वसाहत (बापट कॅम्प) येथील नागरिकांना आपल्या गणेश मूर्ती, घरगुती, दुकानाचे साहित्य सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून घेऊन काही मदत लागली तर भारतीय जनता पार्टी तत्पर असल्याचे सांगितले. त्याचबरोबर काही अडचणी आल्या तर स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्याकडे संपर्क करण्याविषयी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगिलते. 
निवासी उपजिल्हाधिकारी तेली यांना दिलेल्या निवेदनता समाजातील ज्या काही लोकांचे प्रापंचिक साहित्याचे व गणपती मूर्तीचे नुकसान झाले आहे त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी. त्याचबरोबर पूर बाधित असलेल्या लोकांची सर्व व्यवस्था आपल्याकडून करण्यात यावी असे म्हटले आहे. 
यावेळी हेमंत आराध्ये, संदीप कुंभार, अप्पा लाड, राजू मोरे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, राजसिंह शेळके, माधुरी नकाते, किरण नकाते, रोहित पोवार, अमर साठे, विशाल शिराळकर, आप्पा घरपणकर, अनिल कामत, रविकिरण गवळी, योगेश साळोखे, सयाजी आळवेकर, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, अमित पसारे, सचिन सुराणा, दिलीप बोंद्रे, योगेश कांगठाणी, अमेय भालकर उपस्थित होते.