+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule26 Jul 24 person by visibility 254 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनधी : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपाबरोबर पक्षांतर्गत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी काँग्रेसने समन्वय समितीची स्थापना केली असून यात माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात जागा वाटपांबाबत समन्वय असावा यासाठी काँग्रेसने समन्वय समितीची स्थापना केली आहे. ही समिती निवडणुकीपूर्वी महत्त्वाचे निर्णय घेईल. 
 महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करेल. यात काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार सतेज पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान व नितीन राऊत यांचा समावेश केला आहे.