शहाजी कॉलेजच्या खेळाडूंचे विद्यापीठ आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेत यश
schedule05 Dec 24 person by visibility 946 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या सात बॉक्सिंग खेळाडूंनी सुवर्णपदक प्राप्त केले. विद्यापीठाच्या क्रीडा हॉलमध्ये नुकत्याच या स्पर्धा झाल्या.
विजेत्या खेळाडूमध्ये गायत्री कल्याण भड, आदित्य जाधव, तन्मय कळत्रे, राज पाटील, संदेश काटकर, प्रणव रोडे, ओम हिरूर यांचा समावेश आहे. या पदक विजेत्या खेळाडूंची पंजाब भटिंडा येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली.
या खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बाेंद्रे, संस्थेचे रजिस्ट्रार रुपेश खाडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर के शानेदिवाण , रजिस्टर रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, आयक्यूएससी समन्वयक डॉ.राहुल मांडणीकर, सहसमन्वयक डॉ अनिल बलगुडे, जिमखाना विभागप्रमुख डॉ.प्रशांत पाटील, क्रीडा शिक्षक प्रशिक्षक प्रा.प्रशांत मोटे यांचे मार्गदर्शन लाभले.