Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुटबॉलपटूनी चषक जिंकला… अॅक्टिव्हा बक्षीस देऊन होणार गौरवम्युझिकल फाऊटेंनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागरजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कामगिरी भारी, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात प्रथम क्रमांक वूलू स्वच्छतागृह ठरणार महिला भाविकांसाठी आधारवड ! मातृदिनी भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट! !शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी एस. व्ही. पाटील, उपाध्यक्षपदी गजानन कांबळे डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बीआयएसएजी-एनमध्ये निवडकोल्हापुरात महिलांच्यासाठी सर्व सुविधायुक्त वातानुकूलित स्वच्छतागृहे ! रविवारी होणार लोकार्पण !! खडके अकॅडमी बोरपाडळेचा दहावीचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकालआबिटकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्केनूतन मराठी विद्यालयचा दहावीचा निकाल ८१ टक्के

जाहिरात

 

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, दिलबहार तालीम मंडळ विजयी

schedule18 Mar 26 person by visibility 183 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत ‘चंद्रकांत चषक फुटबॉल २०२६’ स्पर्धेला बुधवारी, १८ मार्च २०२६ सुरुवात झाली. उद्घाटन सोहळयाप्रसंगी झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक तालीम मंडळ फुटबॉल संघावर तीन विरुद्ध् शून्य गोलफरकांनी विजय मिळवला. येथील शाहू स्टेडियम येथे ही होत आहे.

शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत, स्थायी समितीचे माजी सभापती संभाजी जाधव, केएसएचे पदाधिकारी माणिक मंडलिक, शिवसेनेचे पदाधिकारी हर्षल सुर्वे, ईस्माइल बागवान, बांधकाम व्यावसायिक रौनक शहा, ओंकार जाधव, बालगोपाल तालीम मंडळाचे राजेंद्र कुरणे, श्रीनिवास शिंदे आप्पासाहेब साळोखे, सुनील पोवार आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी परिवहन समिती सभापतिपदी निवड झाल्याबद्दल सत्यजीत जाधव यांचा बालगोपाल तालीम मंडळातर्फे सत्कार करण्यात आले. फुटबॉलला कीक आणि हवेत फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले.

स्पर्धेतील पहिला सामना शिवाजी तरुण मंडळ फुटबॉल संघ व फुलेवाडी फुटबॉल संघादरम्यान होता. दरम्यान शिवाजी तरुण मंडळ संघाने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. या संघाचे खेळाडू या सामन्यावेळी मैदानावर अनुपस्थित राहिले. यामुळे फुलेवाडी फुटबॉल संघाला पुढे चाल देण्यात आली  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes