Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नगरसेवकांना समज देणार, ऐकले नाहीत तर खासबागेत कुस्ती लावू - हसन मुश्रीफसीईओचे जिल्हाधिकारीपदाकडे लक्ष, कार्तिकेयन झेडपीत किती दिवस काम करणार कोण जाणे ? लोहिया हायस्कूलमध्ये ग्रंथामधून उभारली ज्ञानाची गुढीवालावलकर हायस्कूलमध्ये गुढी ज्ञानाचीगुढी पाडव्यानिमित्त भवानी मंडपाला २५ फुटी साखरेची माळफुटबॉल स्पर्धेतून शिवाजी तरुण मंडळाची माघारचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, दिलबहार तालीम मंडळ विजयीगल्लीतील भांडणसारखे दोन गटनेते महापालिकेत भिडले ! शारंगधर देशमुख - आदिल फरासांत पुन्हा घमासान ! !सांगलीत भाजप चितपट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदी महाविकास आघाडी विजयी !सीईओची ताराराणी महोत्सवाला भेट, बचत गटाकडून वस्तूंची  खरेदी

जाहिरात

 

सीईओचे जिल्हाधिकारीपदाकडे लक्ष, कार्तिकेयन झेडपीत किती दिवस काम करणार कोण जाणे ?

schedule19 Mar 26 person by visibility 542 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : " कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस हे अतिशय धडाडीने काम करत आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. प्रामाणिकपणा व पारदर्शकपणे काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे. मात्र त्यांचे लक्ष आता जिल्हाधिकारी पदाकडे आहे...ते जिल्हा परिषदेमध्ये किती दिवस राहतात, काम करतात कोण जाणे ? ते जिल्हा परिषदेत अधिकारपदावर असेपर्यंत त्यांच्या ज्ञानाचा कामाचा निश्चितच फायदा होईल, नूतन पदाधिकारी व सदस्यानी उत्तम समतोल ठेवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना द्यावी " असे उद्गार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्ष शिल्पा शशिकांत खोत यांचा कार्यालयीन प्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुरुवारी झाला. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयीन प्रवेश झाला. माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, गटनेते सुधीर देसाई,  जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिह कुपेकर, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, बाळासाहेब खाडे, प्रा. किसन चौगुले,  युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड, जिल्हा परिषदेचे सदस्य अमर चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे, गोकुळचे माजी संचालक रामराजे कुपेकर  यांच्या उपस्थितीमध्ये कार्यालयीन प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी मंत्री मुश्रीफ यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने  सादरीकरण झाले. पंतप्रधानांच्या समोर ग्रामीण विकासाच्या आराखड्याचे सादरीकरण सादर करण्याची संधी कोल्हापूरचे मोठी कार्यकारी अधिकारी व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांना मिळाला. सातारा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी या सीईओ कार्तिकेनेस यांच्या पत्नी आहेत या दोघा पती-पत्नी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेमध्ये उत्कृष्ट काम करत वेगळा ठसा उमटवला आहे. मात्र त्यांचे लक्ष जिल्हाधिकारी पदाकडे आहे असे मुश्रीफ यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मुख्य कार्यकारी अधिकारी हे सुद्धा त्यामध्ये सामील झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes