नगरसेवकांना समज देणार, ऐकले नाहीत तर खासबागेत कुस्ती लावू - हसन मुश्रीफ
schedule19 Mar 26 person by visibility 350 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आदिल फरास यांच्यामध्ये जे घमासान झाले त्याची गंभीर दखल मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पत्रकाराशी बोलत असताना त्यांनी " महापालिका सभेत जे घडले ते चुकीचे आहे. नगरसेवकांनी चौकात ये, दाखवतो अशा पद्धतीचे वक्तव्य करणे योग्य नाही. या वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नगरसेवक आहे, त्यामुळे मी जाहीर माफी मागतो. लोकांनी मोठया विश्वासाने निवडून दिलेले असते. महायुती म्हणून साऱ्यांनी एकत्र काम करायचे आहे. महापालिका सभेत जो प्रकार घडला त्या अनुषंगाने आज माझी चर्चा झाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकासाठी विद्यापीठ समोरील जागेची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, महापौर रुपाराणी निकम, व इतर नगरसेवक उपस्थित होते. सभेतील प्रकाराची माहिती कळाली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, व मी आम्ही तिघे मिळून नगरसेवकांमध्ये जो वाद आहे तो मिटवू. त्यांना समज देऊ. तरी कोणी ऐकले नाही तर त्यांची खासबागेत कुस्ती लावू अशा शब्दात मुश्रीफ यांनी तराटणीही दिली.
याप्रसंगी बोलत असताना मंत्री मुश्रीफ म्हणाले गोकुळ संदर्भात सध्या कोर्टात याचिका दाखल आहे. त्याकडे आमचे लक्ष आहे. मात्र गोकुळची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत."
याप्रसंगी बोलत असताना मंत्री मुश्रीफ म्हणाले गोकुळ संदर्भात सध्या कोर्टात याचिका दाखल आहे. त्याकडे आमचे लक्ष आहे. मात्र गोकुळची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत."