Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा कार्यालय प्रवेशअधिकाऱ्यांना शिवीगाळ- महापालिकेत शडडू, सभागृहाला न शोभणारी मर्दुमकी ! नगरसेवकांच्या कृत्यामुळे, नेत्यावर माफीची वेळ ! !नगरसेवकांना समज देणार, ऐकले नाहीत तर खासबागेत कुस्ती लावू - हसन मुश्रीफसीईओचे जिल्हाधिकारीपदाकडे लक्ष, कार्तिकेयन झेडपीत किती दिवस काम करणार कोण जाणे ? लोहिया हायस्कूलमध्ये ग्रंथामधून उभारली ज्ञानाची गुढीवालावलकर हायस्कूलमध्ये गुढी ज्ञानाचीगुढी पाडव्यानिमित्त भवानी मंडपाला २५ फुटी साखरेची माळफुटबॉल स्पर्धेतून शिवाजी तरुण मंडळाची माघारचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, दिलबहार तालीम मंडळ विजयीगल्लीतील भांडणसारखे दोन गटनेते महापालिकेत भिडले ! शारंगधर देशमुख - आदिल फरासांत पुन्हा घमासान ! !

जाहिरात

 

जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा कार्यालय प्रवेश

schedule20 Mar 26 person by visibility 69 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकार्‍यांनी, तालुका आणि गाव स्तरापर्यंत प्रत्यक्ष भेटी देऊन, स्थानिक समस्या जाणून घ्याव्यात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कृतीशील रहावे. जनकल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवा, कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श जिल्हा परिषद होण्यासाठी काम करावे, अशा सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्या. जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या कार्यालय प्रवेश प्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा शुक्रवारी कार्यालय प्रवेश झाला. खासदार धनंजय महाडिक आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर खासदार महाडिक यांनी नूतन अध्यक्षा शिल्पा खोत यांचे अभिनंदन केले. तर खासदार  महाडिक, अध्यक्षा शिल्पा खोत, माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या उपस्थितीत, उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा कार्यालय प्रवेश झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले. जलजीवन मिशनची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करुन, हर घर नल से जल ही मोहीम यशस्वी करावी. विकासाच्या योजनांसाठी निधी कमी पडणार नाही, असे आश्वासन खासदार महाडिक यांनी दिले.  जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या कामाचे खासदार धनंजय महाडिक यांनी कौतुक केले. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्याबद्दल नूतन उपाध्यक्ष पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे, राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, शिवाजी पाटील, संचालक संतोष पाटील, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील-पेरीडकर, अरूण जाधव, अमोल चव्हाण एन. डी. वाईंगडे, इंद्रजित पाटील, शिवानी भोसले, सलिम महात, काकासाहेब सावडकर, महेश पाटील, प्रशांत महापुरे, कुमार कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes