Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नीला सोनटक्के यांचे निधनशक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शनिवारी पंढरपूरमध्ये सद्बुद्धी दिंडी यात्रा , बाधित शेतकऱ्यांची होणार सभा हॉटेल मालक संघाच्या अध्यक्षपदी सचिन शानभाग, उपाध्यक्षपदी अरुण भोसलेसर्किट बेंचच्या अंतर्गत तक्रार समितीची स्थापना ! अध्यक्षपदी न्यायमूर्ती वृषाली जोशी, समिती सदस्यपदी आठ जण ! !शिरोलीत पोलिसांची कारवाई, ग्रामपंचायत सदस्यासह सहा जण वर्षभरासाठी हद्दपार महापालिका स्तरावरील सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलचे वर्चस्वकेआयटीची जागतिक झेप; वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी सामंजस्य करारमार्केट सेस विरोधातील चार ऑगस्टच्या परिषदेस प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधींचा सहभागकंत्राटदारविरहित रोजगार योजनेबाबत सरकारच्या अभ्यास गटाची  बैठकगोळीबारच्या घटनेने कोल्हापूर हादरले, खाजगी सावकारीतून गोळीबाराची चर्चा

जाहिरात

 

ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नीला सोनटक्के यांचे निधन

schedule17 Jul 26 person by visibility 21 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील ज्येष्ठ विधीज्ञ नीला रामचंद सोनटक्के यांचे शुक्रवारी पहाटे (17 जुलै 2026 ) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 84 वर्षांच्या होत्या. जुन्या पिढीतील कोल्हापूर न्यायालयातील ज्येष्ठ वकील म्हणून त्या ओळखल्या जात. त्यांचे आजोबा दत्तात्रय सोनटक्के हे छत्रपती शाहू महाराज संस्थानात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. तर वडील कै. रामचंद्र सोनटक्के हेही न्यायाधीश होते. हाच वारसा नीला सोनटक्के यांनी जपला. दक्षता समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष कायदेशीर तज्ञ म्हणून काम केले. विविध मासिके, दिवाळी अंक, वृत्तपत्रातून कायदेविषयक लिखाणही त्यांनी केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कोल्हापूर वकील संघटनेच्या वृत्तीने श्रद्धांजली वाहण्यात आली. देहदान करून ॲड. नीला सोनटक्के यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes