हॉटेल मालक संघाच्या अध्यक्षपदी सचिन शानभाग, उपाध्यक्षपदी अरुण भोसले
schedule17 Jul 26 person by visibility 4 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या अध्यक्षपदी अयोध्या हॉटेलचे सचिन शानभाग, उपाध्यक्षपदी चोपदार हॉटेलचे अरुण उर्फ अरविंद भोसले- चोपदार यांची एकमताने निवड झाली. कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी शानभाग यांचे नाव आनंद माने यांनी तर उपाध्यक्षपदासाठी भोसले यांचे नाव शिवराज जगदाळे यांनी सुचविले. हॉटेल मालक संघाच्या सचिवपदी हॉटेल ओपलचे सिद्धार्थ लाटकर, सहसचिवपदी हॉटेल सारथीचे संदीप सुर्यवंशी, खजानिसपदी हॉटेल सह्याद्रीचे सुशांत पै व लोकल ऑडिटरपदी शंकर यमेगकर यांची निवड झाली. याप्रसंगी उज्ज्वल नागेशकर, दयानंद शेट्टी, उमेश राऊत, आशिष रायबागे, मोहन पाटील, राजेंद्र माळकर, जयवंत पुरेकर, अमर पाटील, मनोज पुरोहित, उदय भोसले, गौरव कामत, शर्विल काळे, धर्मेंद्र देशपांडे, संजय प्रभावळकर आदी उपस्थित होते.