नाइट कॉलेजमध्ये भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप याविषयी चर्चासत्र
schedule10 Mar 25 person by visibility 31 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर आणि मराठी विभाग, नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूपʼ या विषयावरील दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र १२ व १३ मार्च २०२५ रोजी होत आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे चौदावे अधिवेशन आयोजित केले आहे.
या चर्चासत्राचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांच्या हस्ते बुधवारी १२ मार्च रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम भूषवीत आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष डॉ प्रसाद मगदूम, संचालक ॲड . वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर, संघाच्या चौदाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष प्रा. डॉ गोपाळ गावडे, शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डॉ .नंदकुमार मोरे, शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणधीर शिंदे, संघाचे अध्यक्ष डॉ भरत जाधव, सचिव मांतेश हिरेमठ हे उपस्थित राहात आहेत.
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील भाषा, साहित्य आणि संस्कृती अभ्यास संकुलाचे प्रमुख प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांच्या बीजभाषणाने चर्चासत्रास प्रारंभ होईल. दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे ‘भाषा, साहित्य आणि संस्कृती अभ्यास` या विषयावर मांडणी करतील. ‘भाषाभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूपʼ या विषयावरील सत्रामध्ये प्रा डॉ बाळासाहेब गणपाटील (प्राकृत - मराठी अनुबंध), सारिका उबाळे (भाषा आणि लिंगभाव), प्रा डॉ . उदय पाटील (कृत्रिम बुद्धिमत्ता, भाषा आणि साहित्य) हे मांडणी करणार असून डॉ नंदकुमार मोरे हे सत्राध्यक्ष आहेत .
‘साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूपʼ या विषयावरील सत्रामध्ये श्रीराम मोहिते (साहित्य आणि ललितकला), फारुक काझी (बालसाहित्याचा मानसशास्त्रीय अभ्यास), डॉ .संजय साठे (कलाकृतीचे माध्यमांतर), डॉ. गौतम काटकर (ताम्रपट, शिलालेखांचा भाषिक अभ्यास), डॉ. सुखदेव एकल (लोकविद्या आणि लोकसंस्कृती), डॉ . महेश गायकवाड (साहित्य आणि विज्ञान) हे शोधनिबंधाचे वाचन करणार असून सत्राध्यक्षस्थान डॉ लता मोरे भूषवित आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता खुले शोधनिबंध वाचन होणार असून प्राचार्य डॉ संजय पाटील व डॉ. गिरीश मोरे हे अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळी सात वाजता कवी संमेलन असून अध्यक्षस्थानी प्रा एकनाथ पाटील आहेत .
गुरुवार, दिनांक १३ मार्च, २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता खुल्या शोधनिबंध वाचनाचे सत्र होणार असून प्राचार्य डॉ .राजेखान शानेदिवाण व डॉ .गोमटेश्वर पाटील हे सत्राध्यक्ष असतील. सकाळी साडेदहा वाजता ‘मानव्यविद्या आणि साहित्याभ्यास` या विषयावरील सत्र होणार असून यामध्ये डॉ अवनीश पाटील (साहित्य आणि इतिहासाचा अनुबंध), ज्येष्ठ अभिनेते डॉ. शरद भुताडिया (भाषा, साहित्य आणि नाट्यशास्त्र), प्रा डॉ. माया पंडित (आधुनिक विचार प्रवाह आणि साहित्याभ्यास)` मांडणी करणार आहेत. अध्यक्षस्थानी डॉ. रणधीर शिंदे आहेत .
‘चळवळी आणि साहित्याभ्यासʼ या विषयावरील सत्रामध्ये ह.भ.प ज्ञानेश्वर बंडगर (वारकरी चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक अभ्यासाच्या नव्या दिशा), संपत देसाई (सामाजिक चळवळी आणि साहित्य) हे मांडणी करणार असून डॉ. श्यामसुंदर मिरजकर हे सत्राध्यक्ष आहेत. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे चौदावे अधिवेशन होईल. चर्चासत्राच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ .सुनीलकुमार लवटे हे मार्गदर्शन करतील. प्राध्यापकांचे शोधनिबंध ‘शिविम संशोधन पत्रिकेʼतून प्रसिद्ध केले जाणार आहेत. प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रास उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. उत्तम पाटील, चर्चासत्राचे निमंत्रक व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण शिंदे व समन्वयक डॉ. नंदकुमार कुंभार यांनी केले आहे .
---------------------------------------------
प्रति
मा . संपादक
महोदय,
कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर यांच्या वतीने दिनांक 12 व 13 मार्च 2025 रोजी 'भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप ' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे . या संदर्भातील बातमी सोबत पाठवीत आहे . कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावी ही विनंती .सदरची बातमी आपल्या मेलवरही पाठविली आहे .
कळावे,
आपला,
डॉ. अरुण शिंदे
प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख
नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कोल्हापूर