सावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंद
schedule17 Oct 25 person by visibility 29 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडील अतिदक्षता विभाग व मॅटर्निटी ऑपरेशन थिएटरचे र्निजंतुकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. १८ ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सलग नऊ दिवस हे कामा करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत अतिदक्षता विभाग व मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर बंद राहणार आहे. २७ ऑक्टोंबर २०२५ रोजी स्वॅब रिपोर्ट आल्यानंतर कामकाज सुरु होणार आहे. तरी या कालावधीत संबंधीत रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे रुग्णसेवेचा लाभा घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.