उपकुलसचिव वैभव ढेरे यांना पितृशोक
schedule17 Oct 25 person by visibility 83 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जाधववाडी येथील जयसिंगराव ज्ञानु ढेरे (वय ७८ वर्षे) यांचे शुक्रवारी (१७ ऑक्टोंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी काही काळ भारतीय सैन्यात सेवा बजावली. त्यानंतर भारत संचार निगम लिमिटेडमध्येही सेवा बजावली. शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे यांचे ते वडील होत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजय, मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. रविवारी (दि. १९) सकाळी ८.३० वाजता बापट कॅम्प स्मशानभूमी येथे रक्षा विसर्जन आहे.