Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आता चौथी-सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ! एकवेळची बाब म्हणून फेब्रुवारीत पाचवी-आठवीची परीक्षा !शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपदसावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंदनोव्हेंबर महिन्यापासून मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा टप्पा तीन अभियानसातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी, केएमटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ! कामगारांनी मानले आमदारांचे आभार!! उपकुलसचिव वैभव ढेरे यांना पितृशोकशेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार न दिल्यास तीव्र आंदोलन – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटीलआम्ही गोकुळच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठे केले, कोणाच्या जावईला नव्हे - सतेज पाटलांचा महाडिकांच्यावर हल्लाबोलतावडे हॉटेल कमानीचा धोकादायक भाग उतरविला, नवीन प्रवेशद्वारासाठी तीन कोटीचा निधी-राजेश क्षीरसागरथेट चाळीस टक्के डिबेंचर कपात करता, तालुका संपर्क सभेत त्याविषयी उत्पादकांना का सांगितले नाही ? शौमिका महाडिकांचा सवाल

जाहिरात

 

आम्ही गोकुळच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठे केले, कोणाच्या जावईला नव्हे - सतेज पाटलांचा महाडिकांच्यावर हल्लाबोल

schedule17 Oct 25 person by visibility 400 categoryउद्योग

गाय-म्हैस  दूध खरेदी दरात एक रुपयांनी वाढ, दूध संस्थांना कमिशनमध्ये दहा पैसे  वाढ   

महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर प्रतिनिधी: " गोकुळच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना मोठे केले,  कोणाच्या जावयाला नाही. गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे . कोणा व्यापाऱ्याच्या मालकीचा होऊ दिला नाही " असा हल्लाबोल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते  आमदार व गोकुळचे नेते सतेज पाटील यांनी केला. डिबेंचर कपातीच्या विरोधात निघालेल्या ‘जवाब दो’मोर्चावरुन आमदार पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा गोकुळतर्फे गुलाब जामुन व चीज या उत्पादनांचा विक्री शुभारंभ व महालक्ष्मी कारखाना निर्मित गाभण पशुखाद्य विक्रीचा प्रारंभ असा संयुक्त कार्यक्रम वसुबारस निमित्त झाला. याप्रसंगी पशुपालकांच्या  पशुधनाची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व  आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला याप्रसंगी जेष्ठ संचालक विश्वास पाटील आणि गाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांनी वाढ केली तसेच दूध संस्थांना देण्यात येणाऱ्या कमिशनमध्येही दहा पैसे वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले. ग्राहकावर बोज न टाकता दूध खरेदी दरात वाढ केली आहे. असेही ते म्हणाले
 ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले  गोकुळकडून नेहमीच दूध उत्पादिकांच्या हिताच्या योजना राबवले आहेत. आता ग्राहकावर बोजा न टाकता दूध उत्पादकांच्या हितासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  त्या अनुषंगाने गाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपये वाढ करायची य विचार विनिमय झाला आहे. दूध खरेदी करत वाढ करायचा निर्णय या रविवारी झालेल्या बैठकीत झाला आहे.यामागे गुरुवारी झालेल्या आंदोलनाचा काही संबंध नाही. कोणी मोर्चा काढला हे महत्त्वाचा नाही. मात्र मोर्चामध्ये घेऊन आलेल्या जनावरांच्या पाण्याची व चाऱ्याची सोय गोकुळने केले.
ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, आम्ही आतापर्यंत एसी मध्ये बसून निर्णय घेत होतो. आता गाई म्हशींच्या सानिध्यात बसून निर्णय घेत आहोत. उत्पादकांना दिवाळीची भेट म्हणून म्हैस व गाय दूर खरेदी दरात एक रुपये वाढ तसेच डेअरींना येणाऱ्या कमिशनमध्येही वाढ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यवस्थापन खर्च एक रुपया करण्यात आला तसेच पशुखाद्याच्या दरात पन्नास रुपयांनी कपात करण्यात येत आहे. वास्तविक  डिबेंचर 32 वर्षापासून सुरू आहे. यंदा गोकुळच्या नफ्यात वाढ झाली. मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळसाठी जागा घ्यायचे आहे त्यामुळे डिबेंचर कपातीचा निर्णय झाला.
आमदार  चंद्रदीप नरके म्हणाले, गोकुळची प्रगती उत्तरोत्तर चांगली होत आहे. दूध उत्पादकांना गोकुळच्या कारभाराची चांगली माहिती आहे. अनेक संघर्षांना तोंड देत गोकुळची वाटचाल सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळची वाटचाल उत्तमरित्या सुरू आहे. पाच वर्ष संपत असताना मी या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलो आहे.  निवडणूक झाली की मी त्या संस्थेत जात नाही. प्रत्येक ठिकाणी मी लुडबुड करत नाही. सतेज पाटील कधी कधी माझे ऐकत नाहीत. डिबेंचरचे आंदोलन झाले तरी काळजी करू नका, निश्चितपणे कारभार चांगला आहे.

बोर्ड मिटिंगमध्ये डिबेंचरचा विषय होता, त्यावेळी कोणी बोलले नाही

आमदार सतेज पाटील म्हणाले, " गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना नवीन योजना दिल्या आहेत. गेल्या साडेचार वर्षात दूध खरेदी  वाढ केली. गोकुळ हा शेतकऱ्यांचा आहे, कोणा एका व्यापाऱ्याचा होऊ नये या पद्धतीने काम केले. गोकुळ हा कोणा एकट्याच्या मालकीचा होऊ दिला नाही. आम्ही शेतकरी मोठा करण्याचे काम केले,  कोणाचा जावई मोठा करण्याचा काम केले नाही.  आपुलकी आणि माणुसकी या भावनेतून काम केले.  डिबेंचर संबंधी सर्वमान्य तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. जून महिन्यात बोर्ड मंडळाची मीटिंग झाली त्यामध्ये डिबेंचरचा विषय होता. त्यावेळी कोणी विरोध केला नाही. ज्यांनी ज्यांनी विरोध केला नाही त्यांची नावे जाहीर करा बोर्डातील विषय मान्य करायचा आणि बाहेर येऊन दुसरा भूमिका घ्यायची हे बरोबर नाही." असा टोलाही त्यांनी महाडिक गटाला लगावला.


मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले," गेल्या साडेचार वर्षाच्या कालावधीत गाय दूध खरेदी दरात आठ रुपये  व म्हैस दूर खरेदी दरात पंधरा रुपयांनी वाढ केली.  काटकसरीने कारभार केला की ज्यादा दर देता येतो याचा एक आदर्श व उत्तम नमुना या संचालक मंडळांनी घालून दिला आहे. ज्यांनी डिबेंचरची सुरुवात केली ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गोकुळवर तीस वर्षे सत्ता होती. आता त्यांच्या सूनबाई आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक व तीन पराभूत माजी संचालकानी काल मोर्चा काढला. त्यांचा देखावा लोक ओळखून  आहेत. डिबेंचर्स बदल दूध संस्थांची मते आजमावून घेऊ. ज्या बाजूने जास्त कौल त्या बाजूने निर्णय घेऊ. लोक सगळं जाणून आहेत. प्राथमिक दूध संस्थांना कळवा. विनाकारण याबद्दल गैरसमज नको. तज्ञांची कमिटी नेमा. सीएची मते घ्या. गोकुळवर गायी-म्हशींच्या जनावराने हृदयाला ठेच लागली. " गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी प्रास्ताविक केले.  यावेळी  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर, संचालक बाळासाहेब खाडे, एस. आर पाटील,  रणजीतसिंह पाटील,  करणसिंह गायकवाड,  प्रा. किसन चौगुले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके,  अजित नरके, नंदकुमार ढेंगे,  अमरसिंह पाटील, राजेंद्र मोरे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते. संचालक अभिजीत तायशेटे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes