+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule16 Jul 24 person by visibility 546 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीचे आंदोलन गेल्या अनेक वर्षापासून सुरू होते. रविवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि गजापुरातील मुस्लिम समाजाच्या घरांची तोडफोड झाली. ही घटना निषेधार्हच आहे. मात्र या निमित्ताने राजकारण करण्याच्या हेतूने आमदार सतेज पाटील यांनी पोलीस अधीक्षकांची बदली करा, प्रशासनाने काहीच केले नाही, अशा प्रकारची विधाने केली. गेल्या वर्षीही त्यांनी "कोल्हापुरातील सामाजिक वातावरण बिघडण्याचा प्रयत्र केला जात आहे, कोल्हापुरात दंगल होण्याची शक्यता आहे", असे भाकीत केले होते. त्यानंतर लगेचच काही दिवसांनी टिपू सुलतानचा वादग्रस्त स्टेटस ठेवल्यावरून कोल्हापुरात दंगल घडली. आताही त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर "विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दंगल घडवण्याचे प्रयत होतील" असे विधान केले होते, आणि लगेचच विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्यावरून गजापुरात घरांच्या मोडतोडीची घटना घडली. दोन्ही वेळेला सतेज पाटील यांनी केलेले वत्तव्य कसे खरे ठरले? त्यांना दंगली होणार हे आधी माहिती असते की तेच या दंगलीचे प्रायोजित करतात ? याबाबतही पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. अशी मागणी माजी नगरसेवक सत्यजीत कदम  यांनी केली आहे.
कदम यांनी पत्रकांत म्हटले आहे, ‘विशाळगडवर जी दगडफेक झाली. त्याचे ठरावीक व्हिडीओ व्हायरल झाले. प्रशासनाने सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करून ते जनतेच्या समोर आणावे. या दंगलीत काही संबंध नसलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ताना बळीचा बकरा करून नावे गोवण्याचे कट कारस्थान सुरू आहे. दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंग जाती जातीत तेढ निर्माण करून कोल्हापूरचा सलोखा बिघडवाचे काम करत आहे का ? कारण हिंदूमधील फुट पडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तेथून सलोख्याच्या नावाखाली रसद पुरवली जाते.
गजापुरातील घरांची मोडतोड ही घटना नक्कीच खेदजनक आहे. मात्र सतेज पाटील पालकमंत्री असताना त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यासाठी काय पावले उचलली ? किमान त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणांची पाहणी केली का ? याबाबत एखादी बैठक घेतली का? त्यांना गडाच्या पावित्र्याबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाबद्दल आत्मीयता वाटत नाही का ? विशाळगड आणि परिसरातील पर्यटन विकासासाठी तत्कालीन पालकमंत्री  पाटील यांनी उपाययोजना केल्या का? केवळ सामाजिक तेढ निर्माण होईल अशी भाकीते करून सामाजिक ऐक्याला धोका पोहोचवण्याचं काम सतेज पाटील यांच्या विधानातून होत आहे. लोकसभेला जसा एमआयएमचा पाठींबा घेतला तसेच आत्ताही या स्फोटक स्थितीत एमआयएमच्या इम्तियाज जलीलला मोर्चाला बोलावून वातावरण चिघळवणे चालू आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तपास करताना सतेज पाटील यांच्या विधानांचा देखील विचार करावा तसेच निरपराध हिंदूंना या प्रकरणात विनाकारण न गुंतवता दंगलीची सुरुवात करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.