सरोज पाटील यांना रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार, २५ डिसेंबरला गडहिंग्लज येथे वितरण
schedule19 Dec 25 person by visibility 31 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विद्या प्रसारक मंडळ व जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय रत्नमाला घाळी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २५ डिसेंबर रोजी नारीशक्ती पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला होता. यंदाचा, श्रीमती रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्या व महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी श्रीमती सरोज एन. पाटील यांना जाहीर झाला आहे.अशी माहिती विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी दिली. गडहिंग्लज येथील घाळी सांस्कृतिक सभागृह येथे २५ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि स्त्रियांची उन्नती यासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या उपक्रमशील महिलांना या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. गडहिंग्लज तालुक्याचे माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांच्या पत्नी श्रीमती रत्नमाला घाळी यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. गडहिंग्लज तालुक्याच्या शैक्षणिक वाटचालीत घाळी कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दरवर्षी एका व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले. पत्रकार परिषेदला अॅड बाबूराव भोसकी, किशोर हंजी, अॅड. विकास पाटील, अरविंद कित्तूरकर, शिवयोगी घाळी, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील आदी उपस्थित होते.