भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांना खासदार महाडिकांच्या शुभेच्छा
schedule18 Dec 25 person by visibility 35 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची खासदार धनंजय महाडिक यांनी नवी भेट घेत शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार लोकहिताच्या आणि देशाच्या विकासाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवत आहे. भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढत असून, नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचा अधिक विस्तार होईल, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनहिताच्या अनेक योजना महाराष्ट्रात राबवू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. प्रभावी कार्यशैली, संघटनात्मक दूरदृष्टी आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेल्या नेतृत्वावर भाजपाने ही जबाबदारी दिली आहे. नबीन यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सक्षम आणि गतिमान होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. नबीन यांनीही खासदार महाडिक यांच्याशी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.