राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
schedule19 Dec 25 person by visibility 18 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी, २१ डिसेंबर रोजी होणार आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील पक्ष कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मुलाखती आयोजित केल्या आहेत. उमेदवारीसाठी अर्ज केलेल्या इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाने केले आहे. पक्ष निरीक्षक बाजीराव खाडे, जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, महिला आघाडीच्या अध्यक्षा पदमजा तिवले यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती होणार आहेत.