Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी !अक्षय जहागिरदारला राष्ट्रपती सुवर्णपदक, आर्या देसाईला कुलपती सुवर्णपदक ! !महायुती करणार इलेक्टिव्ह मेरीट उमेदवारांची चाचपणी, उपसमितीची स्थापनाआत्मनिर्भर भारत अंतर्गत फाऊंड्री क्षेत्राला उत्पादनवाढीसह नव्या बाजारपेठांची संधी-प्रदीप पेशकरएसटीच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर विभागाने पटकावले विजेतेपद, जळगावच्या संघाला उपविजेतेपदसतेज पाटील म्हणजे निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करणारे बादशहा : राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल जिपच्या चार अधिकाऱ्यांवर महापालिका निवडणुकीची जबाबदारीभाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांना खासदार महाडिकांच्या शुभेच्छासोशल मिडीयाच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात अडथळे - डॉ. विश्वनाथ मगदूमशिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवारासह पदाधिकाऱ्यांचा शुक्रवारी मेळावा : आमदार राजेश क्षीरसागर गोकुळचा जातीवंत म्हैशींच्या संगोपनावर भर; राधानगरीत कृती कार्यक्रमाला प्रतिसाद

जाहिरात

 

आत्मनिर्भर भारत अंतर्गत फाऊंड्री क्षेत्राला उत्पादनवाढीसह नव्या बाजारपेठांची संधी-प्रदीप पेशकर

schedule19 Dec 25 person by visibility 42 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ‘आत्मनिर्भर भारत मोहिमेतंर्गत फाऊंड्री क्षेत्रासाठी नव्या बाजारपेठा, संरक्षण व पायाभूत क्षेत्रातील मागणी, तंत्रज्ञान उन्नयन तसेच देशी उत्पादन क्षमतेतील वाढीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. उद्योग, कौशल्य, उद्योजकता आणि नवोन्मेष यांचा समतोल व प्रभावी संगम साधला तर कोल्हापूर देशपातळीवर नवे नेतृत्व उभे करू शकते.’ असे मत एमएसएमई विभाग, भारत सरकारचे राष्ट्रीय मंडळ सदस्य व नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटरचे संचालक प्रदीप पेशकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल - एमईडीसी तर्फे ‘एमईडीसी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग परिषद २०२५ - २६’ या शिखर परिषदेला उद्योगजगताचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फाऊंड्री या विषयावर आधारित हा विशेष परिषद सायाजी हॉटेल येथे पार पडली.  जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा धोरणात्मक विभागाचे प्रमुख डॉ. अरुण ढोंगडे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, एमईडीसी चे अध्यक्ष अतुल शिरोडकर, क्षेत्रीय संचालक सत्यजित भोसले, उद्योजक सचिन शिरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये परिषदेचे उद्घाटन झाले. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शेळके, मॅन्युफॅक्चरर्स ऑफ कागल - हातकणंगले फाईव्ह स्टार एमआयडीसीचे अध्यक्ष मोहन कुशिरे, दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्री मेन कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष सतीश कडुकर, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज सीआयआय साउथ झोनचे उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

एमईडीसीचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी स्वागतपर भाषणात एमईडीसी संस्थेबद्दल माहिती दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कामगार टिकवणे हा सध्या उद्योग क्षेत्रासमोरील महत्त्वाचा प्रश्न असून, या संदर्भातही नव्या तंत्रज्ञानाचा आणि नाविन्यपूर्ण संकल्पनाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. कामगारांना उद्योगांमध्ये दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आकर्षक संधी, कौशल्यविकास व आधुनिक पद्धती अंगीकारण्याची गरज आहे.’असे नमूद केले. ‘फाउंड्री उद्योगासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग’ या विषयावर सचिन शिरगावकर यांनी यांनी, केंद्र व राज्य सरकारच्या एमएसएमई विभागातील सर्व योजना थेट औद्योगिक संघटनांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असून, केवळ योजना जाहीर करून न थांबता त्या प्रभावीपणे राबविल्या जाईपर्यंत एमएसएमई विभागाचा सक्रिय सहभाग असावा, असे मत व्यक्त केले. सीए योगेश कुलकर्णी यांनी , ॲड. दत्तात्रय देवळे, फाउंड्री तज्ज्ञ संभाजी पवार यांनी मार्गदर्शन केले. एमईडीसीचे प्रादेशिक संचालक सत्यजित भोसले यांनी आभार मानले. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes