Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चच छचसतेज पाटील म्हणजे निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करणारे बादशहा : राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल जिपच्या चार अधिकाऱ्यांवर महापालिका निवडणुकीची जबाबदारीभाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांना खासदार महाडिकांच्या शुभेच्छासोशल मिडीयाच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात अडथळे - डॉ. विश्वनाथ मगदूमशिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवारासह पदाधिकाऱ्यांचा शुक्रवारी मेळावा : आमदार राजेश क्षीरसागर गोकुळचा जातीवंत म्हैशींच्या संगोपनावर भर; राधानगरीत कृती कार्यक्रमाला प्रतिसादविवाह सोहळा नात्यापलीकडचा…निराधार लेकीच्या कन्यादानाचा पेटंटचे स्टार्टअपमध्ये रूपांतर होणे अत्यंत महत्वाचे – डॉ.मोहन वनरोट्टीसंजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात उलगडली नाना पाटेकरची मुलूखगिरी ! सिनेमा, नाटकासह सामाजिक कार्यावर प्रकाशझोत !!

जाहिरात

 

सतेज पाटील म्हणजे निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करणारे बादशहा : राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल

schedule19 Dec 25 person by visibility 39 categoryमहानगरपालिका

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : "कोल्हापूर शहरातील रस्ते कामासाठी मंजूर झालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप करणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची प्रवृत्ती खोटे बोल पण रेटून बोलायची आहे. निगेटिव्ह नरेटिवह  सेट करणारे ते बादशहा आहेत. मात्र कोल्हापुरातील जनता सूज्ञ आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. महापालिकेच्या  निवडणुकीत निश्चितपणे महायुतीचा भगवा  फडकेल." असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
 कोल्हापूर शहर शिवसेनेतर्फे मिशन महापालिका अंतर्गत शिवसेना पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांचा मेळावा शुक्रवारी अभिषेक लॉन येथे झाल याप्रसंगी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, " मी माझ्या राजकीय जीवनात पक्षाचा आदेश अंतिम मानला. अनेक वेळा माझे नाव मंत्रिपदासाठी पुढे आले. माझ्या नावाची चर्चा झाली. पण मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून  मी कधी नाराज झालो नाही  आपणही पक्षाचा आदेश अंतिम मानून येणाऱ्या महापालिका निवडणूकित पक्ष जो उमेदवार जाहीर करेल त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि महानगरपालिकेवर भगवा फडकवा असे आवाहन केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न होते. आतापर्यंत अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवून ते स्वप्न आपण साकार करू. निवडणुकी जिंकण्यासाठी असते. निवडणुकीत इलेक्टिव मेरीटला प्राधान्य देत जो उमेदवार सक्षम आहे त्याला उमेदवारी दिली जाईल. मात्र  सच्चा शिवसैनिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपली चर्चा झाली आहे. सरकारच्या विविध समित्या आहेत. त्यामध्ये त्यांची वर्णी लावली जाईल. शिक्षण समिती, पाणीपुरवठा समिती, शहर वाहतूक समिती, कचरा व्यवस्थापन समिती अशा वेगवेगळ्या समितीवर ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना संधी दिली जाईल. या निवडणुकीत महायुतीचा जो आदेश असेल त्या पद्धतीने साऱ्यांनी उमेदवारांच्या पाठीशी राहून विजयासाठी प्रयत्न करावेत असेही क्षीरसागर म्हणाले

 भाषणात त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्यावरही टीका केली. क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर शहराचे अनेक वर्ष नेतृत्व काँग्रेसने  केले  मात्र शहर विकासासाठी कोणता प्रकल्प राबवला? महायुती म्हणून कोल्हापूर विकासाला चालना देणारे प्रकल्प आम्ही राबवले आहेत. सर्किट बेचची स्थापना केली. लवकरच हद्दवाढ  होईल. शहराच्या विविध विकास योजनांना गती दिली आहे. मात्र काही मंडळी शंभर कोटीच्या रस्ते कामावरून नागरिकांचे दिशाभूल करत आहेत. वास्तवात  100 कोटी निधीतून  16 पैकी 12 रस्त्यांचे काम 80 टक्के पर्यंत झाले आहे. आणखी चार रस्त्यांचे काम व्हायचे आहे. अजून कामे सुरू आहेत. मग त्यांना भ्रष्टाचार कसा काय दिसतो ? खोटे बोल पण रेटून बोल अशी यांची प्रवृत्ती आहे. निगेटिव्ह  नरेटिव्ह सेट करणारे ते बादशहा आहेत अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला.
 शहर आणि जिल्ह्यामध्ये महायुतीला चांगले वातावरण आहे. चांगले दिवस आलेले आहेत. कोणीही विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असे. विरोधकांच्या षडयंत्रला चोख उत्तर देऊ. असा इशाराही आमदार क्षीरसागर यांनी दिला. शिवसेनेच्या उपनेते व माजी आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका निवडणुकीत साऱ्यांनी एकजुटीने काम करून महायुतीचा भगवा फडकवू या असे आवाहन केले.
शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम म्हणाले, " महायुती म्हणून आपण सगळेजण निवडणूक लढवणार आहोत. सगळ्यांनी महायुतीचा धर्म पाळावा. महायुतीमध्ये जागा वाटप करताना सक्षम उमेदवार हा निकष मानला जाणार आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा हाच निकष लागू असावा. शिवसेनेचे पदाधिकारी शिवाजी जाधव म्हणाले, "  शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर कोणी टीका केली तर आम्ही हे जशास तसे उत्तर देऊ. टीका करणाऱ्यांनी आपले हात स्वच्छ आहेत का हे तपासावे. "
शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, विनायक साळोखे, शहरप्रमुख रणजीत जाधव,  हर्षल सुर्वे, किशोर घाटगे, कुणाल शिंदे कृष्णा लोंढे, पवित्रा रांगणेकर यांची भाषणे झाली. मेळाव्याला माजी महापौर सुनील कदम, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, शारंगधर देशमुख, रमेश पोवार, प्रकाश नाईकनवरे, अजित मोरे, राहुल चव्हाण  रत्नेश शिरोळकर, अभिजीत चव्हाण   सुनील जाधव, कमलाकर जगदाळे, मंगल साळोखे, दुर्गेश लिंग्रस,  नेपोलीयन सोनुले, प्रभू गायकवाड, रणजित मंडलिक, आदर्श जाधव, अरविंद मेढे, स्वरूप कदम, प्रसाद चव्हाण आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes