वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी सदानंद हत्तरकी, उपाध्यक्षपदी चंद्रकांत सांगावकर
schedule27 Nov 23 person by visibility 368 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूजवन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री वीरशैव को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सदानंद हत्तरकी तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत सांगावकर यांची बिनविरोध निवड झाली. विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी झाल्या. बँकेचे ज्येष्ठ संचालक नानासो नष्टे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष हत्तरकी यांनी “आगामी काळात बँकेचा व्यवसाय वाढविणे, बँकेला शेड्यूल दर्जा प्राप्त करणे आणि कर्नाटकात शाखा सुरू करण्याचे नियोजन आहे.’असे सांगितले.
दरम्यान अध्यक्षपदासाठी हत्तरकी यांचे नाव मावळते अध्यक्ष अनिल स्वामी यांनी सुचविले. संचालक महादेव साखरे यांनी त्यास अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी सांगावकर यांचे नाव संचालक डॉ. दिलीप चौखुले यांनी सुचविले, त्यास संचालक राजेंद्र लकडे यांनी अनुमोदन दिले. नूतन अध्यक्ष हत्तरकी हे २०१४ पासून बँकेचे संचालक आहेत. गडहिंग्लज साखर कारखान्यातही ते संचालक आहेत. उपाध्यक्ष सांगावकर हे आठ वर्षापासून संचालक आहेत. यावेळी संचालक राजेश पाटील-चंदूरकर, गणपतराव पाटील, शंकुतला बनछोडे, रंजना तवटे, चंद्रकांत स्वामी, राजेंद्र शेटे, अनिल सोलापुरे, राजेंद्र माळी, सतीश चाळी, वैभव सावर्डेकर, सिद्धार्थ मजती आदी उपस्थित होते. सरव्यवस्थापक राजेंद्र कोरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर यांनी आभार मानले.