कैलास मानसरोवर यात्रेसंबंधी सहज सेवा ट्रस्टतर्फे मोफत मार्गदर्शन
schedule10 May 25 person by visibility 31 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पाच वर्षाच्या खंडानंतर होत असलेल्या कैलास मानसरोवर यात्रेसंबंधी येथील सहज सेवा ट्रस्टतर्फे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सहज सेवा ट्रस्ट ऑफिस, स्टेट बँक ट्रेझरी शाखा बिल्डिंग, शाहूपुरी येथे बारा मे रोजी मार्गदर्शन कार्यक्रम होत आहे. हे मार्गदर्शन विनामूल्य आहे. तरी ज्या यात्रेकरूला या यात्रेमध्ये सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी सूर्यकांत गायकवाड 94232 80677 येथे संपर्क साधावा. यात्रेकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ मे २०२५ आहे. या यात्रेमध्ये १९५०० फूट उंचीवरील ट्रेकिंगचा समावेश असल्याने इच्छुक यात्रेकरू वैद्यकीय व शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंना सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.