किसनराव मोरे ट्रस्टतर्फे पुरस्कार जाहीर, बुधवारी पुरस्कार वितरण समारंभ
schedule11 May 25 person by visibility 37 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील किसनराव मोरे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा पाच जणांना आदर्श पुरस्कार दिला जाणार आहे. बुधवारी (१४ मे २०२५) पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती गोकुळचे संचालक आर. के. मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कै. आमदार किसनराव मोरे यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आदर्श शेतकरी पुरस्कार पिरळ येथील उत्तम रंगराव पाटील यांना, आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार गारगोटी येथील सम्राट मोरे यांना, आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार माध्यमिक विद्यालय पडसाळी येथील प्रभाकर धामणे यांना, आदर्श प्राथमिक शिक्षिका पुरस्कार विद्यामंदिर सोनाळी येथील विद्या रघुनाथ पाटील यांना तर उत्कृष्ट बचत गट पुरस्कार सरवडे येथील सद्गुरू कृपा महिला बचत गटाला जाहीर झाला आहे. राजनंदिनी दयानंद शिंदे (कासारवाडा पाटणकर), जान्हवी अवधूत पाटील (खानापूर) यांचा विशेष सत्कार आहे.
या पुरस्कार वितरण समारंभ खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. पत्रकार परिषदेला बिद्रीचे संचालक डी. एस. पाटील, डी. के. मोरे, प्राचार्य पी. एस. पाटील, विक्रमसिंह मोरे, जयवंत पाडळकर, शिवाजी आदमापुरे, प्रा. अतुल कुंभार, बाजीराव बुजरे आदी उपस्थित होते.