महापूर नियंत्रणाच्या उपाययोजनेसंबंधी सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाची चर्चा
schedule10 May 25 person by visibility 20 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्याबरोबर कोल्हापूर सहित सांगली सातारा जिल्ह्यात येणाऱ्या महापुरासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. महापुराची आपत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली. तसेच उपायासंदर्भात चर्चा झाली. सिटीजन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव, मनसेचे राजू जाधव, प्रकाश सरनाईक, वैभवराज राजेभोसले,राजेंद्र थोरवडे, किशोर घाडगे, गौरव लांडगे, राजेंद्र चव्हाण, महादेव आयरेकर, निवास ब्रह्मपुरे उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे सध्या कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढविण्या संदर्भात करत असलेल्या प्रयत्नाला प्रशासकीय व न्यायालयीन पातळीवर विरोध करण्याची चर्चा झाली.