शांतीनिकेतन शाळेसमोर सेंद्रीय शेती उत्पादनांचे प्रदर्शन
schedule10 May 25 person by visibility 53 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शांतीनिकेतन शाळेसमोर इकोस्वास्थ्य कोल्हापूरतर्फे सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेती उत्पादनांच्या प्रदर्शन भरले आहे. शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू पी. एस. पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी बोलताना प्रकुलगुरू पाटील म्हणाले, ‘ सेंद्रिय आणि नैसर्गिक अन्नधान्ये आरोग्यास चांगली असून त्यातून ग्रामीण भागात नवी अर्थव्यवस्था आकारास येईल. अशा पद्धतीने पिकविलेल्या शेतीमालास ‘इकोस्वास्थ्य’च्यावतीने कोल्हापुरात कायमस्वरूपी सेंद्रिय शेती उत्पादन विषयक सल्ला, मार्गदर्शन, प्रदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध केल्यास ग्राहक आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तसेच कोल्हापुरात सुरू झालेला हा उपक्रम इतत्रही पसरेल.’
या कार्यक्रमास डॉ. दिलीप माळी, सुधीर हंजे, डॉ. तृप्ती करेकट्टी, शरद आजगेकर, वसीम सरकावस, उन्मेष साठे उपस्थित होते. ‘प्लास्टिकला नकार, वसुंधरेला होकार’ या विषयावर इकोस्वास्थच्या वतीने लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या विक्री प्रदर्शनात नैसर्गिक उत्पादनांचे २५ स्टॉल आहेत. प्रदर्शन, रविवारी (११ मे) रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहील.