युद्धात भारताच्या विजयासाठी-सैनिकांच्या सुरक्षेसाठी अंबाबाईला साकडे
schedule10 May 25 person by visibility 15 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत भारताला विजय मिळावा, जगभरात भारताबद्दल अनुकुलता निर्माण व्हावी आणि भारतीय सैन्य तसेच नागरिक सुरक्षित रहावेत यासाठी श्री. करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि कर्मचाऱ्यांच्यावतीने करवीर निवासिनी अंबाबाई देवीला साकडे घालण्यात आले.
देवस्थान समितीकडील माजी सैनिक असलेले सुरक्षा रक्षक महादेव शिंदे आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांना सर्व सैनिकांच्या सठी प्रतिकात्मक प्रसाद देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. अॅड. केदार मुनिश्वर यांनी या उपक्रमाचा हेतू विषद केला. सचिन ठाणेकर यांनी आठवडेकरी श्रीपूजक संजीव मुनिश्वर, माधव मुनिश्वर,अजित ठाणेकर, मंदार मुनिश्वर, अनिल गोटखिंडीकर, सचिन गोटखिंडीकर, विघ्नेश मुनिश्वर, स्वानंद मुनिश्वर, स्वयंम मुनिश्वर, प्रसाद लाटकर यांचा तर अवधूत जोशी यांनी सतीश पंडीत, मुकुंद कुलकर्णी, रविंद्र गोसावी, बाळासाहेब साकेकर, योगेश जोशी, हरीभाऊ झिरळे, संतोष जोशी, नितिन सांगवडेकर, नचिकेत जोशी यांचा आणि सुदाम सांगले यांनी सुरक्षा सुपरवायझर संदीप साळोखे, रक्षक अक्षय साळसकर आणि सफाई कर्मचारी महादेव पाटील यांचा संकल्प करून घेतला.