स्थायी समितीचे अनेक मुद्दे पटत नाहीत, पाणीपट्टी दरवाढीला विरोधच - महापौर रुपाराणी निकम
schedule16 Jul 26 person by visibility 30 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ' कोल्हापूर शहरातील जनतेचा हिताचा विचार करणारी मी महापौर आहे. महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव मांडला असला तरी त्याला विरोधच राहील. 'अशी स्पष्ट ग्वाही महापौर रुपाराणी निकम यांनी दिली. स्थायी समितीमध्ये चर्चा झाल्यानंतर पाणीपट्टी दरवाढीचा विषय सर्वसाधारण सभेसमोर आल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर महापौर निकम यांनी स्थायी समितीचे अनेक मुद्दे आपणाला पटत नाहीत.' अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.
कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापौर निकम यांची महापालिकेत भेट घेतली. याप्रसंगी कृती समितीच्या प्रतिनिधींनी प्रशासनाने पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण समितीसमोर ठेवला आहे स्थायी समितीकडून हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर कसा आला ? अशी विचारणा करताना पाणीपट्टी दरवाढीला आमचा विरोध राहील असे समितीने स्पष्ट केले. त्यावर महापौर निकम म्हणाल्या, " स्थायी समितीकडून आलेला प्रस्ताव म्हणजे अंतिम नाही. सर्वसाधारण सभा निर्णय घेणार आहे. शेवटी महापौरांचा अधिकार असतो. आणि महापौर म्हणून मी कायम कोल्हापुरातील जनतेच्या सोबत आहे. पाणीपट्टी दरवाढीला माझा विरोध राहील. महापालिकेच्या उत्पन्नावर मर्यादा आहेत यामुळे विकास कामाला परिणाम होत असतो म्हणून महापालिकेच्या प्रशासनाने पाणीपट्टी दरवाढीचा विषय मांडला असेल. स्थायी समितीकडून हा विषय पुढे कसा गेला मला माहित नाही. मुळात स्थायी समितीचे अनेक निर्णय मला पटत नाहीत.' अशा शब्दात त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
कृती समितीचे निमंत्रक आर के पोवार, बाबा पार्टे, अनिल कदम, अशोक भंडारे, बाबा इंदुलकर, दिलीप पवार , दिलीप देसाई, महादेव पाटील, फिरोज उस्ताद, किशोर घाटगे, विजय करजगार, गणेश जाधव सुधीर कुलकर्णी आदींच्या शिष्टमंडळाने महापौर निकम यांची भेट घेऊन निवेदन दिले. शहरालगतची जी गावे महापालिका हद्दवाढीत समाविष्ट नाहीत त्यांना महापालिकेकडून सुविधा पुरवू नयेत 'असा मुद्दा कृती समितीच्या प्रतिनिधींनी मांडला. त्यावर महापौर निकम म्हणाल्या, 'हद्दवाढ झाली पाहिजे या मताची मी आहे.शहरालगतच्या गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची नाही. मात्र माणुसकीच्या नात्याने पाणीपुरवठा केला जातो. आसपासच्या गावांना माझी विनंती आहे. त्यांनी हद्दवाढीत समाविष्ट आहे आम्ही त्यांना सगळ्या सुविधा पुरवू.'