Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शहीद महाविद्यालयात गरबा दांडियाचा माहौल, विद्यार्थिंनीनी लुटला आनंद जिल्हा परिषदेत स्वछता ही सेवा अभियानंतर्गत स्वच्छतेची शपथसरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या १२ व्या गळीताचा बॉयलर प्रदीपनकोल्हापूरचा शाही दसरा थाटात, मिरवणुकीतून लोकसंस्कृतीचे दर्शन! मान्यवरांची उपस्थिती !!जिल्ह्यातील ६१८ शाळा महिला शिक्षकाविना !  नजीकच्या शाळेतील शिक्षिकेवर किशोरी संवादची जबाबबारी !!सतेज पाटलांचे दोन्ही सत्ताधारी आमदारांना आव्हान, शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ? रस्त्यांच्या कामाची तपासणी करा !!सतेज पाटलांचे दोन्ही सत्ताधारी आमदारांना आव्हान, शंभर कोटीचे रस्ते कुठे गेले ! रस्त्याचे कामाची तपासणी करा !!ठेकेदाराचा हलगर्जीपणा, कनिष्ठ अभियंत्यांची कर्तव्यात कसूर ! फुलेवाडीतील इमारत दुर्घटना प्रकरण !!जिल्हा परिषद-पंचायत समित्यांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडतअग्निशमन इमारत दुर्घटनेच्या चौकशीसाठी महापालिकेने नेमली समिती

जाहिरात

 

कोल्हापूरचा शाही दसरा थाटात, मिरवणुकीतून लोकसंस्कृतीचे दर्शन! मान्यवरांची उपस्थिती !!

schedule03 Oct 25 person by visibility 26 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  विजयादशमीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात गुरुवारी (२ ऑक्टोबर २०२५) मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात झाला. म्हैसूरनंतरचा देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला. सोने लुटण्याच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या करवीरवासीयांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. “सोनं घ्या सोन्यासारखं रहा” अशा शुभेच्छांसह आपट्याची पाने एकमेकांना देत हा सोहळा साजरा झाला.

यंदा, कोल्हापूरच्या शाही दसरा उत्सवाला प्रमुख राज्य उत्सवाचा दर्जा प्राप्त असून, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांनी शहरात उत्साहाचे वातावरण होते. विजयादशमीच्या निमित्ताने दसरा चौकात शमी पूजनाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने आणि शाही थाटात पार पडला. करवीर निवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानीच्या पालख्यांसह भालदार, चोपदार, घोडेस्वार आणि शाही लवाजम्यासह झालेली मिरवणूक कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी ठरली. या मिरवणुकीदरम्यान मार्गावर दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी करत नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला.
सायंकाळी सहाच्या सुमारास न्यू पॅलेस येथून गाड्यांच्या ताफ्यासह मेबॅक मोटारीतून खासदार शाहू महाराज, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार युवराज मालोजीराजे, शहाजीराजे आणि यशराजे यांचे दसरा चौकात आगमन झाले. उपस्थित करवीरवासीयांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. भालदारांनी ललकारी देत सलामी दिली, तर पोलिस बँडच्या तालावर करवीर संस्थानचे मानगीत गायले गेले. यानंतर सरदार आणि मानकऱ्यांचे मुजरे घेत खासदार शाहू महाराजांसह राजघराण्यातील सदस्य स्थानापन्न झाले. पांढऱ्या रंगाच्या शामियानात सरदार, मनसबदार, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
दसरा महोत्सव समितीच्यावतीने राजघराण्यातील सदस्यांचे स्वागत झाल्यानंतर राजपुरोहित यांच्या पौरोहित्याखाली शमी पूजनाचा विधी पार पडला. यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून अंबाबाईला सलामी देण्यात आली. सोने लुटण्याचा कार्यक्रम हा या सोहळ्याचा कळस ठरला. यावेळी करवीरवासीयांची अक्षरशः झुंबड उडाली. लुटलेले सोने घेऊन राजघराण्यातील सदस्यांना देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. “सोनं घ्या
सोन्यासारखं रहा” अशा शुभेच्छा देत हा उत्सव उत्साहात साजरा झाला.

मान्यवरांची उपस्थिती

शाही सोहळ्याला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के डीवाय पाटील समूहाचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes