शहीद महाविद्यालयात गरबा दांडियाचा माहौल, विद्यार्थिंनीनी लुटला आनंद
schedule03 Oct 25 person by visibility 52 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नवरात्र उत्सवामधील मुख्य आकर्षण म्हणजे गरबा दांडिया होय. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे आयोजित केलेल्या 'दांडियामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी माहौल निर्माण केला .दम मारिया, अंबे अंबे, ढोल बाजे अशा विविध गाण्यांवर महाविद्यालयाच्या विद्याथिनीनी ठेका धरला होता.
या दांडियासाठी बारा ग्रुपनी सहभाग घेतला होता. सर्वच ग्रुपने उत्कृष्ट सादरीकरण केले. बीएस्सी आयटी एसवाय ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवला. बीसीए एसवायने दृतीय क्रमांक मिळवला या कार्यक्रमासाठी परिवेक्षक म्हणून प्रा. शुभांगी भारमल, विजय वाइंगडे लाभले. यावेळी वेस्ट फॉर बेस्ट या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि दहीहंडी स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. एसएनडीटी विभागीय युथ फेस्टिवलमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थिनींना सत्कार करण्यात आला. एसएनडीटी आयोजित क्रीडा महोत्सवांमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार यावेळी करण्यात आला. दांडिया महोत्सवाचे समन्वयन प्रा. सागर शेटगे व प्रा. ज्योती शिंदे यांनी जबाबदारी पाहिली. प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा.स्नेहल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दिग्विजय कुंभार यांनी आभार मानले. यावेळी नर्सिंग प्राचार्य सरिता धनवडे, फार्मसी प्राचार्य स्नेहल माळी, आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य हिमांशू चव्हाण उपस्थित होते.