किकवी दूध प्रकल्प मालमत्ता खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी
schedule02 Oct 26 person by visibility 18 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाने पुणे जिल्ह्यातील मे अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेड किकवीची मालमत्ता खरेदी करताना आर्थिक व प्रशासकीय अनिनिमिता झाली आहे. सहकार संस्थेने केलेल्या चौकशीतही किकवी खरेदी प्रकल्पात आर्थिक अनियमितता झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. दरम्यान 82 कोटी सहा लाखाची ही मालमत्ता खरेदीसाठी तेरा कोटी र रुपयांच्या खर्चास संचालक मंडळांनी विशेष वित्तीय प्रशासकीय मान्यता दिली आहे. या मालमत्ता खरेदीमध्ये जवळपास 50 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे या साऱ्या प्रकरणी संचालक मंडळ दोषी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी तसेच या मालमत्ता खरेदी प्रक्रियेतील अनेक माजी संचालक सध्या गोकुळची निवडणूक लढवत आहेत त्यामुळे गोकुळची निवडणुक स्थगित करावी अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. ठाकरे पक्षाच्यावतीने या प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप यापूर्वीही करण्यात आला होता. तसेच गोकुळ मधील विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पाच्या खरेदी प्रक्रियेबाबत तक्रार केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या साऱ्या प्रकाराची दखल घेऊन तत्काळ चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी पवार यांनी केली. शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही गोकुळच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा बाजार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी केली. तर शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी किकवी प्रकल्प खरेदी प्रक्रियेची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. पत्रकार परिषदेला अवधूत साळोखे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे शहरप्रमुख मंनजीत माने, महिला आघाडीच्या रिमा देशपांडे आदी उपस्थित होत्या