Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
‘स्वमन सामाजिक’तर्फे कोल्हापुरात मानवाधिकारसंबंधी जनजागृतीप्रॅक्टिस फुटबॉल क्लबतर्फे बुधवारी आजी – माजी फुटबॉलपटूंचा सत्कारसतेज पाटलांचा प्रचाराचा धडाका, महायुतीचे नेते अडकले जागा वाटपाच्या चक्रात !!जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुष्काळी जत तालुक्यातील गावांची पाहणीअभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ जाहीरवन्यजीव सप्ताह निमित्त खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून  सन्मानएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी प्रा .विलास  नांदवडेकर  ग्रामीण भागांशी जोडलेलं, अनुभवी नेतृत्व ! रामचंद्र भोगमांची उमेदवारी दूध उत्पादकांना वाटतेय आपली !!मराठी अध्यापक संघातर्फे दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलनशेतकऱ्यांचा आवाज गोकुळमध्ये उमटणार, समविचारीतून बाबासाहेब देवकरांच्या उमेदवारीला उत्पादकांची पसंती

जाहिरात

 

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबतर्फे बुधवारी आजी – माजी फुटबॉलपटूंचा सत्कार

schedule01 Oct 26 person by visibility 14 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी – शतकमहोत्सवी प्रॅक्टिस फुटबॉल क्लबतर्फे बुधवारी सात ऑक्टोबर २०२६ आजी – माजी फुटबॉलपटूंचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.१९६० पासून क्लबकडून खेळलेल्या जवळपास २०० खेळाडूंचा सन्मान होणार आहे. द रामकृष्ण् लॉन येथे दुपारी चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल अशी माहिती क्लबचे अध्यक्ष नितीन सावंत, सचिव रमेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदार धनंजय महाडिक हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. आमदार अमल महाडिक, ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सदस्य व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती आहे. तसेच महापालिकेचे परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, नगरसेविका जयश्री सचिन चव्हाण, माधुरी किरण नकाते, नीलांबरी गिरीश साळोखे  हे उपस्थित राहणार आहेत. आजी – माजी फुटबालपटूंचा मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मान होणार आहे.पत्रकार परिषदेला संतोष महाडिक, विजय जाधव, चंद्रशेखर देशपांडे, राजेंद्र वायचळ, मारुती सावंत, अनिल महाजन आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes