‘स्वमन सामाजिक’तर्फे कोल्हापुरात मानवाधिकारसंबंधी जनजागृती
schedule01 Oct 26 person by visibility 10 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :- स्वमन सामाजिक मानवाधिकार परिषदेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात मानवाधिकार जनजागृती व मार्गदर्शनाचे व्यापक अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानतंर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावांमध्ये शाखा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे चांगुलपणाची चळवळीचे समनवयक पारस ओसवाल यांनी सांगितले.
मानवी हक्कांची संरक्षण आणि त्याबाबत जनजागृती करणे ही केवळ सरकारची नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे हे जाणून स्वमन सामाजिक मानवाधिकार परिषद काम करणार आहे. नागरिकांना त्यांच्या हक्काची माहिती कायदेशीर प्रक्रिया, सरकारी योजना व विविध नागरी समस्यांच्या सोडवणुकीसंबंधी मार्गदर्शन होणार आहे. नागरिकांनी आपल्या समस्या केवळ तक्रार म्हणून न मांडता कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने त्या स्वतः कशा सोडविता येतील या अनुषंगाने त्यांना सक्षम करण्यात येणार आहे. विशेषतः डॉक्टर, वकील, शिक्षक ,महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि मानवाधिकार विषयात काम करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्यास कायदेशीर व प्रशासकीय वर्गाची माहिती देऊन नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले जाईल. हक्कांची जाणीव ठेवा, अन्यायविरुद्ध कायदेशीर मार्गाने आवाज उठवा हे अभियानचे सूत्र आहे. या अभियानमध्ये सहभागी होण्यासाठी स्वमन सामाजिक मानवाधिकार परिषद, शाहू स्टेडियम पहिला मजला, गोखले कॉलेज रोड येथे संपर्क साधावा असे आवाहन संघटनेने केले आहे. पत्रकार परिषदेला अॅड.नारायण पवार, उदय चौगुले , पूनम मोरे, मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.