Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
किकवी दूध प्रकल्प मालमत्ता खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, शिवसेना ठाकरे पक्षाची मागणीशिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी - प्राचार्य अभयकुमार साळुंखेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रव्यवहाराची दखल न घेणाऱ्या कार्यालयांवर कारवाई कराअखिल भारतीय किसान सभेचे २४ वे अधिवेशन कोल्हापुरात‘स्वमन सामाजिक’तर्फे कोल्हापुरात मानवाधिकारसंबंधी जनजागृतीप्रॅक्टिस फुटबॉल क्लबतर्फे बुधवारी आजी – माजी फुटबॉलपटूंचा सत्कारसतेज पाटलांचा प्रचाराचा धडाका, महायुतीचे नेते अडकले जागा वाटपाच्या चक्रात !!जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुष्काळी जत तालुक्यातील गावांची पाहणीअभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ जाहीरवन्यजीव सप्ताह निमित्त खडके अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून  सन्मान

जाहिरात

 

शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी - प्राचार्य अभयकुमार साळुंखे

schedule02 Oct 26 person by visibility 17 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सद्य परिस्थितीत शिक्षणात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या दूर करून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी पुणे विधान परिषद शिक्षक मतदार संघातील तरुण व तडफदार उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना विजयी करावे असे आवाहन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.

     कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका येथे प्रचार दौऱ्यानिमित्त प्राचार्य  साळुंखे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ऐतवडे बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक संकुलात शिक्षक मतदारांना आवाहन केले.
    पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार  कौस्तुभ गावडे  यांच्या प्रचारार्थ वाळवा तालुक्यातील प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांनी गुरुदेव कार्यकर्त्यांसमवेत शाळांमध्ये भेटी देऊन शिक्षक मतदारांशी संवाद साधला.
    कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे साहेब यांनी प्रथम कुरळप या ठिकाणी साखर संघाचे  माजी अध्यक्ष पी. आर. पाटील  यांच्या घरी भेट दिली. ऐतवडे बुद्रुक येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या वास्तव्य असणाऱ्या पाटील वाड्याला भेट दिली. त्यानंतर ऐतवडे खुर्द येथे डॉ. प्रकाश पाटील यांच्या शैक्षणिक संकुलाला भेट दिली त्यानंतर चिकुर्डे, वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी व कासेगाव एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर या ठिकाणच्या विविध शाखांना भेटी दिल्या.
     यावेळी तालुका प्रचार प्रमुख प्राचार्य उमेश जाधव यांनी स्वागत केले. तासगावचे प्राचार्य सुरेश पाटील, माजी सहसचिव पी. एस. चव्हाण, माजी विभाग प्रमुख प्रकाश हाके, प्राचार्य व्ही. एच. पाटील, माणिक वांगीकर, माजी मुख्याध्यापक दिलीप चरणे, माजी आजीव सेवक बेडगे, बी. एन. माळी, प्रा. अविनाश पाटील, मुख्याध्यापक डी. आर. पाटील,  मुख्याध्यापक संजय शिंदे, मुख्याध्यापिका रंजना पाटील, शैल्य चव्हाण, मुकेश पाटील, प्रा. अमोल सोनवणे, वलांडकर सर, रंजीत कुंभार, उल्हास पाटील, अश्रफ जमादार, एम. के. खतीब, इम्रान मुलानी, युवराज कदम, कुणाल जाधव हे सहभागी होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes